Home महाराष्ट्र “सख्खे भाऊ पक्के वैरी”वांबोरी घाटातील डोंगरगण शिवारात गोणीत घालुन टाकलेल्या मृतदेहाचे बाप...

“सख्खे भाऊ पक्के वैरी”वांबोरी घाटातील डोंगरगण शिवारात गोणीत घालुन टाकलेल्या मृतदेहाचे बाप लेकच निघाले मारेकरी, टाकळीमियाॅ येथील किरण कवाणे याचा केला होता खुन,४७ तासात पोलिसांनी लावला छडा आणि संशयीतांना केले गजाआड

“सख्खे भाऊ पक्के वैरी”वांबोरी घाटातील डोंगरगण शिवारात गोणीत घालुन टाकलेल्या मृतदेहाचे बाप लेकच निघाले मारेकरी, टाकळीमियाॅ येथील किरण कवाणे याचा केला होता खुन,४७ तासात पोलिसांनी लावला छडा आणि संशयीतांना केले गजाआड

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

टाकळीमीया तालुका राहुरी,जिल्हा अहिल्यानगर, येथील किरण शिवाजी कवाणे (वय वर्षे ३२) यांचा त्याचा सख्खा भाऊ योगेश शिवाजी कवाणे(वय वर्षे ३०), आणि वडील शिवाजी शंकर कवाणे (वय वर्षे ५५) दोघे राहणार टाकळीमीया , तालुका राहुरी,जिल्हा अहिल्यानगर,यांनी संगनमताने खुन करून मृतदेह खताच्या मोकळ्या झालेल्या गोणीत घालुन वांबोरी घाटातील खोल दरीत फेकून दिला होता.पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरून सदर मृतदेह हा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथिल किरण शिवाजी कवाणे या तरूणाचा असल्याची माहिती मिळवण्यात यश मिळवले होते.या बाबत मयताचा भाऊ योगेश कवाणे आणि वडील शिवाजी शंकर कवाणे या बाप-लेकांना संशयित म्हणून पोलीसांनी ताब्यात घेतले होते.पोलीसी खाक्या दाखवताच मयताचा भाऊ योगेश शिवाजी कवाणे हा पोपटा सारखा मिटू मिटू बोलू लागला होता.आणि या खुनास वाचा फुटली होती.या खुना बाबत त्याने पोलिसांना अशी माहिती दिली की भाऊ किरण शिवाजी कवाणे हा सतत दारू पिऊन घरी येत असे आणि विनाकारण आई वडिलांना मारहाण करीत असे.या नेहमीच्या छळाला कंटाळून आम्हीच दिनांक १७ फेब्रुवारी रोजी त्याचा काटा काढून मृतदेह अहिल्या नगर तालुक्यातील डोंगरगण शिवाराच्या हद्दीत गट नंबर ४७४ मध्ये असलेल्या वांबोरी घाटात खताच्या गोणीत घालुन खोल दरीत फेकून दिल्याचे सांगितले होते. या बाबत एम आय डी सी पोलिसांना माहिती मिळताच.एम आय डी सी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १२०/२०२६ बी.एन.एस.कलम १०३(१),२३८ कलमान्वये पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शेषराव तांदळे यांनी गुन्हा दाखल केला होता.अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी त्वरित घटनास्थळी भेट देवून सदर मृतदेह खोल दरीतून बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी अहिल्या नगर येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला होता. अहिल्या नगरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब,नगर ग्रामीणचे उप अधीक्षक शिरिष वनमे साहेब,शहर विभागाचे पोलिस उप अधीक्षक डॉ दिलिप टिपरसे साहेब,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कबाडी साहेब,यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली होती.सदरचा मृतदेह पायाकडून एक गोणी आणि डोक्याकडून एक गोणी घालून खोल दरीत फेकून दिल्याचे आढळून आले होते.पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकास आणि फाॅरेन्सीक लॅबोरेटरीच्या डॉक्टरांना पाचारण केले होते.उत्तरीय तपासणीत हा खुनाचाच प्रकार असल्याचे डॉक्टरांनी आपल्या अहवालात स्पष्ट सांगितले होते.सदर मृतदेहाच्या उजव्या हाताच्या मनगटावर “छत्रपती” तर छातीवर “सोनाली”असे इंग्रजीत गोंदलेले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कबाडी साहेब यांच्या मार्गदर्शना खालील पोलिस पथकाने टाकळीमीया येथे जाऊन या मयताच्या कुटूंबाची ओळख पटविण्यात आणि मयताचे नाव उघड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. किरण शिवाजी कवाणे हे टाकळीमीया,तालुका राहुरी,जिल्हा अहिल्यानगर येथील कायम रहिवासी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते.आणि ते तिन दिवसांपासून बेपत्ता झाले होते अशीही माहिती पोलिसांना मिळाली होती.वैद्यकीय अहवाल आल्यानंतर हा खुन करून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला असल्याची माहिती मिळवण्यात पोलिस यशस्वी झाले होते. पोलीसांनी या संदर्भात बाप-लेकांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनीच घडलेली घटना मुद्देसूद पणे पोलिसांना सांगितल्या नंतर या गुन्ह्याचा उलगडा झाला होता.बाप लेकांनी संगनमताने खुन केल्याची कबुली दिल्या नंतर या गुन्ह्यात वापरलेली स्वीफ्ट कार नंबर एम एच ४६ एक्स ७४६० ही गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.दोन्ही संशयित आरोपीची एम आय डी सी पोलिस स्टेशनमध्ये रवानगी करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कबाडी साहेब यांच्या अधिपत्या खालील पोलिस पथकाने केली आहे.एके काळी तमाषा पंढरीत गाजलेले वगनाट्य “सख्खे भाऊ पक्के वैरी” येथे या घटनेत तंतोतंत लागू पडते.

Don`t copy text!