जिल्हा न्यायालयातील महिला वकीलांच्या हळदी-कुंकू समारंभात घेतली बालविवाह मुक्तीची शपथ

जिल्हा न्यायालयातील महिला वकीलांच्या हळदी-कुंकू समारंभात घेतली बालविवाह मुक्तीची शपथ

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

अहिल्यानगर येथील जिल्हा सरकारी न्यायालय परिसरात महिला वकीलांनी महीलांचा पारंपरिक हळदी-कुंकू समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पार पाडला.अहिल्या नगर शहरातील सर्व महिला वकिल आणि महीला पोलीस अधिकारी यांनी बाल विवाह मुक्त भारत घडविणे या उद्देशाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हा बालविवाह मुक्त करन्याची शपथ घेतली.

हा हळदी कुंकू समारंभ बाल कल्याण समितीच्या सदस्या ॲडव्होकेट अनुराधा दिनेश येवले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा साठी जिल्हा न्यायालया तील सर्व महिला वकील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कोतवाली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.वंदना फाटके-जगताप या उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम श्रीवास्तव,ॲड. स्वाती पाटील, ॲड.जया पाटोळे, ॲड.मनीषा केळगंद्रे,ॲड. मनीषा डूबे,ॲड. सुजाता कोठारी, ॲड.बागेश्री जरंडिकर,महिला सचिव ॲड. सारिका झरेकर, कार्यकारीणी सदस्य ॲड. प्राजक्ता करांडे, ॲड.सुजाता पंडित,ॲड.निरू काकडे,ॲड.कुंदा दांगट,ॲड. शिल्पा शेळके, ॲड.रूपाली पठारे,ॲड. पल्लवी होनराव यांच्या सह अनेक महीला वकिलांच्या उपस्थित

ॲड.अनिता दिघे,ॲड. वृषाली तांदळे,ॲड.भक्ती शिरसाट,ॲड. अर्पिता झरेकर, ॲड.मनीषा पंडुरे, ॲड.आशा गोंधळे,ॲड. सुचेता कुलकर्णी, ॲड.अरुणा राशिनकर,ॲड. सुनिता गोरडे, ॲड.रिजवाना शेख,ॲड.करुणा शिंदे,ॲड. यास्मिन शेख इत्यादी महिला वकिलांना सन्मानित करण्यात आले. तसेच अहिल्या नगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन, कोतवाली पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन आणि भिंगार पोलीस स्टेशनच्या सर्व महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील सन्मानित करण्यात आले. प्रारंभी या

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.अनुराधा येवले यांनी केले. प्रास्ताविकात त्या म्हणाल्या की, जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेल्या महिला वकील आपल्या खाजगी कामाच्या व्यापात इतक्या व्यस्त असतात की,एकमेकींशी संवाद साधण्याची संधी देखील त्यांना कधीच मिळत नाही.या हळदी कुंकू कार्यक्रमां मुळे सर्व महिला पोलीस आणि महिला वकील यांना एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण करण्याची संधी मिळाली.महीला वकिल या न्यायालयीन क्षेत्रात प्रामाणिक पणे काम करीत असताना त्या उपेक्षित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी विषेश मोलाची भूमिका बजावत आहेत. बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी अहिल्यानगर येथील सर्व महिला वकील व महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने संकल्प करण्यात आला आहे.महिला वकीलांचा हळदी-कुंकू समारंभ हा दरवर्षी प्रमाणे गेल्या १५ वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्ष पदावरून बोलताना कोतवाली पोलीस स्टेशनच्या

सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात म्हणाल्या की,या समाजात बदल घडविण्यासाठी कायदे जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच सामाजिक संवेदन शीलतेचे योगदान ही अत्यंत आवश्‍यक आहे. बालविवाह ही केवळ कायद्याचीच नव्हे तर समाजातील सर्व घटकांची अतिशय गंभीर सामाजिक समस्या आहे. आज आम्ही सर्व महिला वकील आणि पोलीस अधिकारी एकत्र येऊन बालविवाह मुक्त जिल्हा घडवण्याचा संकल्प करीत आहोत ही बाब समाजाला अत्यंत प्रेरणादायी आहे. संपूर्ण जिल्ह्यात या कायद्याची अंमल बजावणी करताना समाज प्रबोधन होणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.सर्व महिला वकील या समाजाच्या पायाभूत बदलासाठी प्रभावीपणे आपली भूमिका बजावत असून जिल्हा पोलीस प्रशासन ही त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहे. संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हा बालविवाह मुक्त करण्यासाठी आपण सर्वजण नक्कीच यशस्वी होऊ,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.प्रमुख पाहुणे या पदावरून बोलताना

डॉ.वंदना फाटके-जगताप म्हणाल्या की, आजचा हळदी-कुंकवाचा सोहळा हा केवळ आपल्या सांस्कृतिक परंपरे पुरता मर्यादित न राहता उपस्थित महीला मध्ये आपल्या आरोग्या संदर्भात जन जागृतीची जाणिव होणे अत्यंत आवश्‍यक आहे.घरातील महिला ही आपल्या कुटुंबातील अत्यंत महत्त्वाची घटक असते.तिचे आरोग्य चांगले राहीले तर सर्व कुटुंबाचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होते.यावेळी त्यांनी महिला वकीलांसाठी अरुणोदय हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व रोग निदान शिबिर घेण्याचे स्पष्ट केले.

या कार्यक्रमा साठी महिला वकील प्रिया खरात,सुरेखा भोसले,अनुजा काटे,सारिका खाकाळ,सविता साठे,मीनाक्षी कराळे,संगीता पाडळे,कौन्सिलर संगीता सुसर, रुबीना पठाण, मुबीना जहागीरदार,प्रज्ञा उजागरे,विमल खेडकर,भावना पालीकुंडवार, दीक्षा बनसोडे, मोनाली कराळे, अर्चना राऊत, पल्लवी गीते, गिरीजा गांधी, मीना भालेराव, सुजाता कुमार, ज्योती ठुबे, सोनल वेलदे, ज्योती हिमणे, काकडे,सुविद्या तांबोळी,मीना शुक्रे, लता गांधी, शितल दुसुंगे, अरुंधती कांबळे, मनीषा जाधव, गौरी सामलेटी, ज्योत्स्ना ससाने, स्नेहल लोखंडे, शिल्पा राजपूत, पल्लवी बारटक्के, शकुंतला मोरे, पुरी मॅडम आदींसह महीला वकिल मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. आभार ॲड. अरुणा राशिनकर यांनी मानले. शेवटी सर्व महिलांना तिळगुळ देऊन संसारोपयोगी साहित्याचे वाण वाटण्यात आले.