जातीय तणाव, जातीय दंगलीची भाषा मी खपवून घेणार नाही संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाई सोनवणे यांचा शेगाव येथे इशारा

आम्हाला महाराष्ट्र शांत पाहिजे आहे
++++++++++++++++++
जातीय तणाव, जातीय दंगलीची भाषा मी खपवून घेणार नाही
—————————————–
जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या सभा मी उधळून लाविन..!
+++++++
संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाई सोनवणे यांचा शेगाव येथे इशारा
++++++++
संविधान आर्मीचे राज्यव्यापी तिसरे अधिवेशन शेगाव येथे हजारोंच्या संख्येत संपन्न
+++++++++
दिनांक 26 नोव्हेंबर 23 संविधान दिनी ऑल इंडिया संविधान आर्मी तर्फे शेगाव येथे हजारोंच्या संख्येत संविधान तिरंगा गौरव रॅली व संविधानवादी जन आक्रोश तिसरे राज्यव्यापी अधिवेशन शेगाव येथे संपन्न झाले
संविधानाचे उद्घाटन नगरसेविका व मोलकरीण नेत्या आणि संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष सौ पुष्पाताई जगन सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले
राज्यव्यापी तिसरे अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष, सविधान रक्षक सैनिक, भावी आमदार भुसावळ, संविधान बचाव चळवळीचे प्रणेते, संविधानवादी नेते जगन भाई सोनवणे हे होते
संविधानाच्या प्रारंभी तिरंगा ध्वज पूजन व संविधान पूजन आणि संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे , संविधान आर्मी महिला आघाडी अध्यक्ष, नगरसेविका व सौ.पुष्पाताई जगन सोनवणे व महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका पंचशीला ताई भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांचा सत्कार तिरंगा ध्वज, संविधानाची प्रत, व संविधान निर्माते यांची प्रतिमा देऊन करण्यात आला
अधिवेशनाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून शहरातून संविधान गौरव तिरंगा रॅली हजारोंच्या संख्येत संविधान आर्मीच्या सविधान रक्षक सैनिक यांच्या वतीने काढण्यात आली
यावेळी संविधान रॅलीत सहभागी संविधान रक्षक सैनिकांच्या हातात तिरंगा ध्वज व संविधानाच्या प्रती होत्या
+++++
दादर येथे दिनांक 6 डिसेंबर रोजी तिरंगा रेल रोको आंदोलन होणार – जगन सोनवणे
+++++++++++
भाजपाचा केंद्र सरकार व राज्य सरकारने अनेक शहराचे नामांतर केले व 18 रेल्वे स्टेशनचे देखील नाव बदलले पूर्वीचे मुंबई चे व्हिक्टोरिया टर्मिनस vt हे नाव देखील बदलले आणि छत्रपती शिवाजी महाराज सीएसटी असे ऐतिहासिक नामांतर केले मात्र भाजपा व राज्याच्या केंद्र सरकारने दादर येथील रेल्वे स्टेशनचे आतापर्यंत नामांतर केलेले नाही देशभरातून व जगभरातून संविधान निर्माते परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील चैत्यभूमीस अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक दादर येथे चैत्यभूमीस नतमस्तक होऊन अभिवादन करतात मग भाजपाचे केंद्र सरकार बाबासाहेबांचे नाव दादरच्या रेल्वे स्टेशनस ला देण्यास का भेदभाव करीत आहे? हा बाबासाहेबांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही…. हा भेदभाव, अपमान बाबासाहेबांचा थांबलाच पाहिजे व नामांतर झालेच पाहिजे या एकमेव मागणीसाठी चलो दादर रेल्वे स्टेशन येथे दुपारी दोन वाजता संविधान आर्मी व विविध 10 संघटना आणि सर्व आंबेडकरवादी व संविधानवादी भीमसैनिक आणि संविधान रक्षक सैनिकांच्या वतीने तिरंगा रेल रोको आंदोलन दुपारी दोन वाजता होणार आहे अशी जाहीर घोषणा संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांनी शेगाव येथील जाहीर सभेत संविधान दिनी दिनांक 26 नोव्हेंबर 2023 या रोजी केली
महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका पंचशीला भालेराव संभाजीनगर यांनी यावेळी संविधान गौरव व भीम गीते गाऊन जनतेचे प्रबोधन केले
संविधान आर्मीचे राज्यव्यापी तिसरे अधिवेशन प्रारंभ होण्यापूर्वी संविधानाच्या प्रस्ताविकीचे सामूहिकरीत्या वाचन करण्यात आले व शेवटी राष्ट्रगीत म्हणून समारोप करण्यात आला
तिसरे राज्यव्यापी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी संविधान आर्मीचे विदर्भ महामंत्री दैनिक मलकापूर सम्राट चे संपादक व पत्रकार , संविधान रक्षक सैनिक भिवाभाऊ चोपडे तसेच शेगावचे संविधान आर्मीचे सविधान रक्षक सैनिक तालुका अध्यक्ष , सविधान रक्षक सैनिक कमलाकर शेगोकार, सविधान रक्षक सैनिक शेगाव नगरीचे शहराध्यक्ष व बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष विलास शेगोकार तसेच बुलढाणा संविधान आर्मी जिल्हाध्यक्ष धनराज भाई गोडे यांनी प्रचंड परिश्रम घेतले व तिसरे राज्य व अधिवेशन यशस्वी केले.