बुद्धिबळ स्पर्धेत ही गुरुकुल स्कूल ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी 

बुद्धिबळ स्पर्धेत ही गुरुकुल स्कूल ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी

 

 

 

पाचोरा येथे आयोजित तालुकास्तरिया १९ व १७ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थिनींनी जोरदार कामगिरी दाखवत सर्वांचे लक्ष वेधले.

त्यातील १७ वर्षाखालील झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत गुरुकुल स्कूल ची विद्यार्थिनी श्रावनी अलहित हिने आपल्या खेळाचे जबरदस्त प्रदर्शन करत तालुक्यातील इतर प्रतिस्पर्धस्पर्धियांवर मात करत तालुक्यात पहिला क्रमांक पटकवला व जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. सदर विद्यार्थीनीचे तालुका संमन्वयकानकडून सुवर्ण पदक देवून गौरव करण्यात आला.

 

त्याचप्रमाणे १९ वर्षाखालील झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत गुरुकुल स्कूल ची विद्यार्थिनी हर्षिता कुकरेजा हिने आपल्या खेळाचे उत्कृष्ठ प्रदर्शन करून तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावला,व जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

विद्यार्थिनीच्या या यशप्राप्तीने गुरुकल स्कूल चे प्राचार्य प्रेम शामनानी सर यांनी विजेत्यांचे सुवर्ण पदक तसेच रौप्य पदक देऊन गौरव केला. व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थिनीना क्रीडा शिक्षिका साक्षी पवार व क्रीडा शिक्षक निरंजन राठोड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून त्यांचा प्रशिक्षणामुळेच विद्यार्थिनींनी ही घवघवीत यशप्राप्ती केली आहे. कॅरम, बॅडमिंटन व बुद्धिबळ अशा

एका पाठोपाठ तीन्ही क्रीडांमध्ये विजयामुळे गुरुकुल स्कूलचा विद्यार्थानमध्ये नवा आत्मविश्वास संचारला असून , इतर विद्यार्थांनाही प्रेरणा मिळाली आहे.