छत्रपती शिवाजी महाराज अखिल विश्वाचे प्रेरणास्थान – संजय वाघ

छत्रपती शिवाजी महाराज अखिल विश्वाचे प्रेरणास्थान – संजय वाघ

पाचोरा येथील एस एस एम एम महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी इतिहास विभागाच्या वतीने आयोजित गड किल्ले पोष्टर प्रदर्शन कार्यक्रमात पा.ता.सह. शि. सं. चे चेअरमन नानासाहेब संजय वाघ बोलताना म्हणाले की,स्वराज्याची खरी ताकद ही गडकिल्ले होती याच गड किल्ल्यांवरून अनेक मावळ्यांच्या एतिहासिक पराक्रमाची साक्ष हे गडकिल्ले देतात आणि म्हणून महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्र बाहेर कुठल्याही गड किल्ल्यावर गेले तर तेथील मावळ्यांचा आणि महाराजांच्या पराक्रमाची साक्ष ते गडकिल्ले आजही देत असतात हीच गड किल्ले आम्हाला नवी ऊर्जा आणि नवी प्रेरणा देत असतात म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल विश्वाचे प्रेरणास्थान आहे असे प्रतिपादन नानासाहेब संजय वाघ यांनी केले यावेळी सतीश आप्पा चौधरी संजय सुर्यवंशी सेवा निवृत्त प्राचार्य बी एन पाटील प्राचार्य डॉ शिरीष पाटील डॉ वासुदेव वले प्रा.जी बी पाटील प्रा डॉ जे डी गोपाळ प्रा.एस टी सुर्यवंशी प्रा.जे पी बडगुजर प्रा. एन वाय पाटील प्रा.डॉ के एस इंगळे प्रा पी एम डोंगरे प्रा डॉ एस बी तडवी प्रा.डॉ माणिक पाटील प्रा.राजेश वळवी प्रा वाय बी पुरी प्रा.गौरव चौधरी प्रा.पी वी देसले प्रा.बंटी महाजन प्रा.सोहत्रे प्रा विजया देसले प्रा.छाया पाटील प्रा.प्राजक्ता शितोळे प्रा.स्वप्नील ठाकरे प्रा. एम वी पाटील प्रा संदीप पवार प्रा.एम एम माळी प्रा.सौ एम के पाटील प्रा.स्वप्नील भोसले प्रा.रोहित पवार प्रा स्वप्नील पाटील श्री मच्छिंद्र पाटील घनश्याम करोसिय जावेद देशमुख शिक्षक विद्यार्थी आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली प्रा.डॉ माणिक पाटील व त्यांच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या पोष्टर प्रदर्शनाचे रिबीन कापून उद्घाटन नानासाहेब संजय वाघ व मान्यवरांच्या हस्ते झाले सूत्रसंचालन प्रा.डॉ.के एस इंगळे यांनी केले तर आभार डॉ माणिक पाटील यांनी मानले.