महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय संघाच्या वतीने मा महसूल मंत्री महोदय यांनी निलंबित केलेल्या उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी यांचे निलंबन मागे घेण्याबाबत तसेच प्रलंबित मागण्यांबाबत कामबंद करणेकामी नोटीस 
दिनांक: १७ डिसेंबर २०२५
स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
आज दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय संघटनेच्या वतीने डॉ. श्रीमंत हरकर, अपर जिल्हाधिकारी, जळगाव यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाद्वारे संघटनेने महसूल विभागाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले असून, विभागाला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसह इतर प्रशासनिक सुधारणा तातडीने राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना जिल्हा स्तरावरील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संघटनेचे पदाधिकारी श्री. योगेश नन्नवरे, श्री. आर डी. पाटील, श्री. प्रदीप पाटील, श्री. जितेश चौधरी, श्री. देविदास अडकमोल यांनी निवेदनाचे मुद्दे स्पष्टपणे मांडले.
डॉ. श्रीमंत हरकर यांनी निवेदन स्विकारून शासनस्तरावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

















