पाचोरा सहकारी औद्योगिक वसाहत पाचोरा पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक भूषण वाघ यांचा दणदणीत विजय

पाचोरा सहकारी औद्योगिक वसाहत पाचोरा पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक 2022 ते 2027
भूषण वाघ यांचा दणदणीत विजय

पाचोरा ( प्रतिनिधी) येथील पाचोरा सहकारी औद्योगिक वसाहत पंचवार्षिक निवडणुकीत नम्रता पॅनल दणदणीत विजय मिळवला या अगोदर दहा जागांसाठी बिनविरोध नम्रता पॅनल उमेदवार निवडून आले होते. ओबीसी मतदारसंघाची एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीसाठी माजी आमदार दिलीप वाघ यांचे सुपुत्र माजी नगरसेवक भूषण वाघ .यांचा 69 मतांनी विजय झाला 148 पैकी 102 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात एक मत बाद झाले भूषण वाघ यांच्याविरोधात नंदकुमार सोनार यांना बत्तीस मतांवर समाधान मानावे लागले पराभव झाला नम्रता पॅनमध्ये कारखानदार मतदारसंघात पुनमचंद मोर, एकनाथ तावडे दिलीप मुकुंदराव पाटील, मुकेश कुमार अग्रवाल, सचिन कोठावदे ,उमेश राखा, रवींद्र देवरे ,रेखा मथूरवैश्य, लता देवी जैन, विक्रांत पेंढारकर यांचा बिनविरोध या अगोदरच निवड झाली होती .पाचोरा औद्योगिक वसाहत ही आदरणीय कै.वासी के. एम. पाटील तसेच आदरणीय बाबुलालजी बाजोरिया व शहरातील प्रमुख मान्यवर यांच्या कल्पनेतून अथक परिश्रमातून सदर औद्योगिक वसाहत निर्माण झाली होती. ही निवडणूक रविवार दिनांक 6 मार्च दोन हजार बावीस रोजी सकाळी आठ ते चार यादरम्यान पार पडली लागलीच सायंकाळी मतमोजणी होऊन एका जागेसाठी निकाल जाहीर झाला यात माजी नगरसेवक माजी आमदार दिलीप वाघ यांचे पुत्र भूषण वाघ यांचा दणदणीत विजय झाला व्यापारी बांधवांमध्ये पुनमचंद मोर. विजय जैन. भाईदास आग्रवाल. भागचंद राका, सुभाष अग्रवाल, पिटीसी व्हाईस चेअरमन विलास जोशी ,प्रकाश एकनाथ पाटील ,राजेंद्र बोथरा,जगदीश पटवारी, गोपाल पटवारी, कमल पटवारी, रवी केशवानी, दत्ता जडे, भागवत महाल पुरे पंचायत समिती सदस्य ललित वाघ ,यांचे योगदान लाभले .
या निवडणुकीसाठी माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासाठी हा विजय सहज होता. यावेळी गटनेते संजय वाघ, प्रवक्ते खलील देशमुख, नगरसेवक तालुकाध्यक्ष विकास पाटील, सकाळी विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे,वासुदेव महाजन ,नाना देवरे, हारून देशमुख, शशिकांत चं दिले ,भगवान मिस्त्री, संजय सूर्यवंशी ,रवींद्र देवरे, सचिन कोठावदे, मुकेश अग्रवाल ,उमेश राखा ,अरुण पाटील, विनोद पाटील, सुनील पाटील ,गोपी पाटील, रोहित वाणी, आदी उपस्थित होते विजयाने भूषण वाघ यांना पेढा भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी कामकाज पाहिले