महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यानां तात्काळ अटक करा अन्यथा राज्यभर करणार आंदोलन

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यानां तात्काळ अटक करा अन्यथा राज्यभर करणार आंदोलन

 

धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना धुळे जिल्हा पत्रकार संघटनेने दिले निवेदन

 

 

धुळे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई च्या डिजीटल, मीडियाचे प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांनी दैनिक जनप्रवास या वृत्तपत्रकातून असे म्हटले होते की, पाकिस्तान मधील क्रिकेट खेळाडू जसे पाकिस्तान प्रेम दाखवतात तसे प्रेम, बॉलीवूडमधील खान बंधू अभिनेते आपल्या देशाबद्दल उघडपणे भारत प्रेम का दाखवत नाही आपण देखील भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत असे खान बंधूंनी देखील देशप्रेम दाखवायला हवं होते असे लिखाण केल्याने त्यांना जाहीर माफी नमागितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघच्या माध्यमातून राज्यभर जिल्हास्तरावर निषेध केला जात आहे.याचाच भाग म्हणून दि 11 रोजी धुळे येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघच्या जिल्हा युनिट तर्फे धुळे येथील पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात पत्रकार संघाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोषींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषींना अटक नझाल्यास पत्रकार तीव्र आंदोलन करतील, असा इशारा हि देण्यात आला.

 

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे राज्य उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, नाशिक विभाग अध्यक्ष जितेंद्र राजपूत, इलेक्ट्रॉनिक मीडिया नाशिक विभाग अध्यक्ष समाधान मैराळे, खान्देश विभागीय उपाध्यक्ष प्रा डॉ विजय गाढे, धुळे जिल्हा डिजिटल मीडिया अध्यक्ष सुनिल पाटील,पत्रकार राजेश बागुल, ओंकार जाधव, उत्तम पवार, अमळनेर तालुका उपाध्यक्ष प्रवीण बैसाणे, उपाध्यक्ष नूर खान, युवराज अंबर मोहिते, आत्माराम अहिरे, कृष्णा भाऊ, महेंद्र सूर्यवंशी, सत्तार खान, भाग्यश्री पाटील यासह जिल्ह्यातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.