जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने व श्री श्री 1008 स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने

ॐ जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने व श्री श्री 1008 स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने

श्री क्षेत्र गोंडगाव ता.भडगाव जि. जळगाव(खान्देश) येथे होणाऱ्या *राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा बाबाजींचे 33वे पुण्यस्मरण दिनांक28नोव्हेंबर ते 5डिसेंबर2022पर्यंत भव्यदिव्य स्वरूपात आयोजित केले जाणार आहे तसेच कै विजकुमार सुदर्शन आहिरे यांचे संकल्पप्रती बाबाजींचे 33वे पुण्यस्मरणाचा श्री क्षेत्र गोंडगाव ता भडगाव जिल्हा जळगाव ला प्रथमच सौभाग्य प्राप्त झाले आहे तसेच बाबाजींचे 33वे पुण्यस्मरण महाराष्ट्रात श्री क्षेत्र वेरूळ, श्री क्षेत्र ओझर,श्री क्षेत्र पुणतांबा व श्री क्षेत्र गोंडगाव आश्रमात मोठ्या उत्साहात साकार होणार आहे या चारही ठिकाणी राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा2022 या नावाने संपन्न होणार आहे या सोहळ्यात पुरुष व महिला जपानुष्ठान, एकनाथी भागवत पारायण,33कुंडी यज्ञ ,अखंड नामजप, प्रत्येक तालुक्याचे अखंड नंदादीप, हस्तलिखित जप साधना,कीर्तन सप्ताह इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन केले आहे या धर्म सोहळ्याला कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त होणार आहे
दि 11/9/22ला या राष्ट्रनिर्माण धर्म सोहळ्याची बैठक श्री क्षेत्र गोंडगाव येथे घेण्यात आली यात वेरूळ आश्रमाचे विश्वस्त श्री शिवाकाका अंगुलगावकर यांनी धर्म सोहळ्यात कश्या प्रकारे नियोजन करावे ते सांगितले या सोहळ्याच्या वेगवेगळ्या कमिटी स्थापून त्यांना कामाची जबाबदारी सोपवून दिली तसेच गोंडगाव गावातील भक्तभक्तांनी स्वेच्छेने धर्माची घोषणा करून स्वेच्छेने कामाचे वाटपही करून घेतले यात ज्यास्तीत ज्यास्त तरुण मंडळीनी सहभाग घेतला
या बैठकीची प्रस्तावना धरणगावचे श्री दगडू गुरुजींनी सुरवात करून धुळे जिल्हा सेवक घोडके नाना यांनी बाबाजींच्या कार्याची व धर्मसोहळा बद्द्लचे मनोगत व्यक्त केले,गोंडगावचे रामचंद्र पाटील यांनी दानधर्म करणाऱ्या दानशूरांची नांवे सांगितले
तसेच बैठकीच्या अगोदर महाश्रमदान योजनेप्रमाणे काही तास सर्वांनी बाबाजींच्या गोंडगाव आश्रमात श्रमदान केले या बैठकीत जयबाबाजी भक्त परिवाराचे जिल्हा सेवक संजय पाटील, जिल्हा सहसेवक अजय पाटील, जिल्हा संपर्क सेवक अंबरसिंग तात्या भडगाव चे सेवक अशोक पाटील,पाचोऱ्याचे दिलीप पवार,परोळ्याचे रवी पाटील,चाळीसगाव चे,शांताराम पाटील,यावलचे प्रकाश पाटील,एरंडोल चे नांदुभाऊ,जामनेर चे डॉ परदेशी, धरणगावचे दगडू गुरुजी,अमळनेर चे,कैलास महाजन यांनी उपस्थिती होती तसेच बैठकीच्या शेवटी या राष्ट्रनिर्माण धर्म सोहळ्याच्या मुख्य कमिटीचे अध्यक्ष डॉ गणेश सुदर्शन आहिरे व मुख्य कमिटीने उपाध्यक्ष बीजेपी सैनिक आघाडीचे तालुका अध्यक्ष श्री समाधान भाऊ यांनी आभार प्रती सांगता केली तसेच गोंडगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते