वैशालीताई सुर्यवंशी यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

वैशालीताई सुर्यवंशी यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन

 

*पाचोरा, दिनांक १३ (प्रतिनिधी )* : जळगाव लोकसभा मतदारसंघात आज होत असलेल्या मतदानात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघातील जास्तीत जास्त लोकांनी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्यासाठी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघात प्रचाराची धुरा यशस्वीपणे सांभाळली. त्यांनी पायाला चक्रे लाऊन मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला.

 

दरम्यान, आज सकाळी सात वाजेच्या सुमारास पीटीसी सोसायटी संचलीत एसएसएमएम महाविद्यालयात त्या आपल्या मातोश्री श्रीमती कमलताई पाटील, पती नरेंद्रसिंगदादा सुर्यवंशी आणि कन्या कु. सिद्धी सुर्यवंशी यांच्यासह दाखल झाल्या. येथे त्यांनी बुथ क्रमांक २०६ मध्ये आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.

 

याप्रसंगी त्यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेने लोकशाहीतील सर्वोच्च हक्क असणारे मतदान करण्याचे आवाहन केले. आज कितीही काम असले तरी ते सोडून आधी मतदान करण्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.