पाचोरा शहरात युवकांच्या उपक्रमांची जिल्हातून कौतुक गोरगरीब जनतेच्या पोटा करीता झटणारे युवक आज आधरवड ला तीन वर्षे पूर्ण

प्रथमतः आपल्या आधारवड मधील सदस्य कै. महेंद्र जी अग्रवाल यांना श्रद्धांजली अर्पण करतो

पाचोरा शहरामध्ये मागील तीन वर्षापासून( १ एप्रिल २०१८ ) स्व चि देवांश याच्या पुण्यस्मरणार्थ शहरातील काही युवकांनी मिळून राजे संभाजी युवा फाउंडेशन
संचालित आधारवड
म्हणून एक सामाजिक उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाला आज १ एप्रिल २०२१ ला तीन वर्ष पूर्ण झाले आधारवड उपक्रम अंतर्गत दररोज किमान ७०/८० गरीब निराधार लोकांना जेवण दिले जाते covid-19 महामारी मध्ये सुद्धा या आधारवड ने अनेक गरजू गरीब लोकांन पर्यंत अन्न व गरजेचे वस्तू पुरवण्याचे अनमोल काम आपल्या परिसरा मध्ये केले आपल्या शहरातील काही व्यवसायिक तरुण प्रवीण पाटील, भूषण देशमुख ,राहुल पाटील ,रवींद्र देवरे यांच्या संकल्पनेतून आधारवड उपक्रम सुरू झाला आधारवड ला हळू हळू मदतीचे हात जोडले गेले त्यात कै.महेंद्र शेठ अग्रवाल ,
महेंद्र रायगडे , पो. कॉ. किरण दादा पाटील , लक्ष्मण पाटील, सचिन सदांशीव यांचादेखील सहभाग आहे
आधारवड संस्थेत मागील तीन वर्षापासून ज्या अन्नदात्या ने आणि सहकाऱ्यांनी आधारवडला सहकार्य केले अशा दात्यांचे मनापासून खूप खूप आभार
आधारवड नेहमीच कशाही प्रकारच्या सामाजिक लोक हिता करता सामोरे
जाण्याकरता नेहमी तत्पर असेल
ध्येय- आधारवड च्या माध्यमातून गोरगरीब भुकेलेल्या पीछाडलेला या सर्वच नीआश्र असलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे आणि एक वेळेची का होईना त्यांच्या पोटाची भूक मिटवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आधारवड ला पाचोरा शहर व शहराबाहेरून खूप पसंती दिली जाते हेच प्रेम हाच विश्वास आणि ह्याच आपल्या सहयोगाने आधारवड आज तीन वर्ष पूर्ण करत आहे
नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे पोलिस प्रशासन,सरकारी अस्तापणे या करता आमचे हे कार्य सर्वत्र प्रसिद्ध करण्या करता पाचोरा शहरातील पत्रकार बंधू नेहमीच आमच्या पाठीशी ठाम पणे उभे असतात त्यांचे पण खूप खूप आभार
असेच प्रेम आणि सहयोग ठेवा हीच विनंती

आपलेच आधारवड