पाचोऱ्यात क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मारक उभारणी कामाचे भूमिपूजन सोहळा आ.श्री किशोर पाटील यांच्या शुभहस्ते १ नोव्हेंबर रोजी

१ नोव्हेंबर रोजी क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मारक उभारणी कामाचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.भुमिपुजन शुभहस्ते आमदार श्री किशोर  पाटील पाचोरा भडगाव यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे..

सर्व माळी समाज व बहुजन समाज बांधवांना उपस्थितीचे आव्हान- कृती समितीचे अध्यक्ष. शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन करत आहेत.

पाचोरा: येथे स्री शिक्षणाचे जनक क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मारक उभारणी कामाचे भूमिपूजन श्री किशोर अप्पा पाटील आमदार पाचोरा -भडगाव यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झाले असून बहुजन समाज व माळी समाज बांधवांच्या व सामाजिक संघटनांच्या मागणीवरून पाचोरा न.पा ने ठराव केलेल्या हुतात्मा स्मारक शेजारी नियोजित जागी आमदार किशोर अप्पा पाटील पाचोरा – भडगाव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या शुभहस्ते १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता भुमिपुजन सोहळा संपन्न होत आहे.
महात्मा फुलेंच्या स्मारक उभारणी साठी पाचोरा शहरातील व तालुक्यातील माळी समाज व बहुजन समाज बांधवांची मागील बऱ्याच वर्षांपासून मागणी होती. यासाठी क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मारक निर्माण कृती समिती स्थापन करण्यात आली आहे.त्या कृती समितीचे अध्यक्ष शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) व सर्व सदस्य माळी समाज व बहुजन समाज बांधवांन कडून उपस्थित रहाण्याचे आव्हान करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे ठिकाण. हुतात्मा स्मारक शेजारी नियोजित जागी पाचोरा जिल्हा जळगाव टीप.सर्व बहुजन समाज व माळी समाज बांधवांनी कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे.असे आवाहन कृती समिती अध्यक्ष व सदस्यांन कडुन करण्यात येत आहे ही विनंती.