श्री. शेठ मु. मा. महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
पाचोरा दि. 07 – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. वासुदेव एस. वले यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी कविता सादर केली.
यावेळी प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष बी. पाटील, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, डॉ. के. एस. इंगळे, प्रा. पी. एम. डोंगरे, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अतुल पाटील, डॉ. शरद पाटील, डॉ. माणिक पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. शुभम राजपूत, प्रा. प्रदीप रुद्रसवाड, प्रा. अर्चना टेमकर, प्रा. गौरव चौधरी, डॉ. सरोज अग्रवाल, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. संजिदा शेख, प्रा. सुनीता तडवी, प्रा. अक्षय तडवी, प्रा. ज्योती नन्नवरे, श्री. संतोष महाजन, श्रीमती ज्योती जाधव, श्री. घन:श्याम करोशिया, श्री. बी. जे. पवार, श्री. सुनील नवगिरे, श्री. सुरेंद्र तांबे, श्री. जयेश कुमावत, श्री. सतीश पाटील, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. के. एस. इंगळे यांनी केले.

























