पाचोरा तब्बल महिनाभरापासून वरखेडी नाका समर्थ पेट्रोल पंप पर्यंतचे हायलॅम्प बंदच;तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याची माहिती!

पाचोरा तब्बल महिनाभरापासून वरखेडी नाका समर्थ पेट्रोल पंप पर्यंतचे हायलॅम्प बंदच;तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याची माहिती!

पाचोरा शहरातून जाणाऱ्या जळगाव चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य हायवेवर वरखेडी नाका पासून ते समर्थ पेट्रोल पंप पर्यंत नवीन बसवण्यात आलेली हायलॅम्प तब्बल महिनाभरापासून बंद असून भर पावसाळ्यामध्ये नागरिकांना या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नवीनच झालेल्या या हायवे मुळे डिव्हायडर टाकलेले असल्याकारणाने नवीन लवकर रस्ता समजत नाही, यामुळे मोठा अपघात होऊ शकतो? यामुळे स्थानिक नागरिकांना हे हायलॅम्प बंद असल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत असून लवकरात लवकर हायलॅम्प सुरू करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. सदर प्रकरणाची माहिती अशोका बिल्डकॉन या कंपनीकडून घेतली असता हायलम्प सुरू होते परंतु सुरु असलेल्या लाईनमध्ये अज्ञात व्यक्तींनी खोडसाळपणा केल्यामुळे किंवा वीज कनेक्शन घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे या मध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. सदर बिघाड लवकरच क्लिअर करून सुरळीत करण्यात येईल अशी माहिती अशोका बिल्डकाँनच्या अधिकारी यांनी दिली आहे