चोपडा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन

चोपडा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयात आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावर आधारित कार्यशाळेचे आयोजन सोमवार दि. १८ मार्च, २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील प्र- कुलगुरू डॉ.एस.टी.इंगळे तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.ए.पी. डोंगरे हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील ह्या उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, पारोळा, धरणगाव, भडगाव या पाच तालुक्यातील एकूण १४ महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेमध्ये नवीन शैक्षणिक धोरणात झालेले बदल, यासंदर्भात विद्यार्थ्यांना करावयाचे मार्गदर्शन, शैक्षणिक वेळापत्रकाची निर्मिती, विद्यार्थ्यांनी विषयाची निवड कशी करावी, त्याचप्रमाणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल विद्यार्थी तसेच प्राध्यापक यांच्यात जनजागृती व्हावी या उद्देशाने विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असून त्यावर तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे
या कार्यशाळेमध्ये जिल्हाभरातून तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रातील महाविद्यालयांमधील प्राध्यापक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन या कार्यशाळेचे प्रमुख संयोजक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, कार्यशाळा समन्वयक प्रा.डी.एस.पाटील तसेच डॉ. एल.बी. पटले यांनी केले आहे.