गोपीचंद पुना पाटील,विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत दैदिप्यमान यश….!!!!!!

गोपीचंद पुना पाटील,विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत दैदिप्यमान यश….!!!!!!

 

भडगाव (वार्ताहर) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,*गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव* येथील तथा *किसान स्पोर्ट्स अकॕडमीच्या* मल्लांनी जिल्हा क्रीडा कार्यालय व भडगाव तालुका क्रीडा समितीतर्फे आयोजित तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत *१५ खेळाडूंनी* विविध वयोगट तसेच वजन गटात विजयश्री प्राप्त करीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत,दोन खेळाडू अंतिम सामन्यात उपविजयी ठरले.

 

*स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे….!!!!*

 

*_१७ वर्षाआतील,फ्रीस्टाईल (मुले)_*

 

*१) कमलेश पाटील (५१ किलो द्वितीय)*

*२) भावेश जितेंद्र पाटील (८० किलो प्रथम)*

 

*_१७ वर्षाआतील,ग्रीकरोमन (मुले)_*

 

*३) योगेश रावते (४५ किलो द्वितीय)*

*४) सनी भालेराव (४८ किलो प्रथम)*

*५) विवेक शिंदे (५१ किलो प्रथम)*

*६) रोशन पाटील (५५ किलो प्रथम)*

*७) स्वराज प्रल्हाद चौधरी (६५ किलो प्रथम)*

*८) ओम बोरसे (९२ किलो प्रथम)*

 

*_१७ वर्षाआतील (मुली)_*

 

*९) तनु पाटील (४९ किलो प्रथम)*

 

*_१९ वर्षाआतील फ्रीस्टाईल (मुले)_*

 

*१०) यश पाटील (६१ किलो प्रथम)*

*११) गणेश महाजन (६५ किलो प्रथम)*

*१२) सुनील फासगे (७४ किलो प्रथम)*

 

*_१९ वर्षाआतील ग्रीकरोमन (मुले)_*

 

*१३) ओमकार कराळे (४९ किलो प्रथम)*

*१४) भावेश मच्छिंद्र पाटील (६० किलो प्रथम)*

*१५) राकेश भील (७२ किलो प्रथम)*

 

*_१९ वर्षाआतील (मुली)_*

 

*१६) प्रेरणा पाटील (५३ किलो प्रथम)*

*१७) गायत्री गोसावी (५९ किलो प्रथम)*

 

स्पर्धेत घवघवीत यश मिळवणाऱ्या खेळाडूंना *आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,राष्ट्रीय खो-खो पंच प्रेमचंद चौधरी* यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक आदरणीय *नानासाहेब प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयीन सचिव प्रशांतराव पाटील,प्राचार्य अनिल पवार,पर्यवेक्षिका सिमा शिसोदे* तसेच शिक्षक-शिक्षकेतर,प्राध्यापक-प्राध्यापिका आदिंनी आनंद व्यक्त करीत व अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.