पिंपळगाव हरेश्वर येथील नूतन वास्तू उद्घाटन सोहळा संपन्न

पिंपळगाव हरेश्वर येथील नूतन वास्तू उद्घाटन सोहळा संपन्न

ग्राम विकास मंडळ पिंपळगाव हरेश्वर संचलित खाजगी प्राथमिक विद्यामंदिर पिंपळगाव या नूतन वास्तूचे उद्घाटन दिनांक 12 फेब्रुवारी 2022 रोजी संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन जळगावचे खासदार दादासो उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा ताई पाटील व पाचोऱ्याचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ तर प्रमुख अतिथी म्हणून अमोलभाऊ शिंदे, मधुभाऊ काटे, रत्नप्रभा पाटील, दीपस्तंभ संचालक यजुर्वेंद्र महाजन, पाचोर्‍याचे प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल ,ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष देविदास महाजन, चिटणीस रवींद्र जाधव , संचालक मिलिंद देव मौजुलाल जैन ,डॉ शांतीलाल तेली, खुर्शीद मिस्तरी, राजेंद्र क्षीरसागर, दिवाकर बडगुजर ,प्रदीप पवार ,यशवंत पाटील ,मंदाताई पाटील ,संतोष पवार, सुकलाल राठोड हे संचालक ,मुख्याध्यापक शशिकांत महालपुरे, प्राचार्य प्रमोद महाजन, ग्रामविकास मंडळाचे सर्व शाखांचे कर्मचारी उपस्थित होते