श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला

श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.

 

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पा. ता.सह.शि.संस्थेचे व्हाइस चेअरमन नानासो.व्ही.टी. जोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन मा.नानासो. संजयजी वाघ तसेच स्कुल कमिटीचे चेअरमन बापूसो. जगदीशजी सोनार जेष्ठ संचालक तथा राम मनोहर लोहिया (राणीचे बांबरुड) हायस्कुलचे स्कुल कमिटी चेअरमन अण्णासो.दगाजी वाघ तसेच शाळेच्या प्र. मुख्याध्यापिका श्रीमती. उज्वला साळुंके मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमपूजन करून कार्यक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीतातून मान्यवरांचे स्वागत केले.तद्नंतर शाळेतील आय.टी.एस. व सर्व इयत्तेतुन प्रथम आलेले विद्यार्थी तसेच शालेय विविध मैदानी क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, दांडिया स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, वकृत्व स्पर्धा.….इ अनेक बौद्धिक व मैदानी स्पर्धेतील नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले आले.
प्रसंगी नानासो.संजयजी वाघ यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून कौतुकास्पद व प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासो. व्ही.टी.जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.वर्षा पाटील व श्री.संदीप वाघ सर यांनी केले . तर श्री.मनोज पवार सर यांनी सर्व उपस्थित मान्यवर,पालकवर्ग,विद्यार्थी इ.सर्वांचे आभार व्यक्त केले . कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले….