पाचोरा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न 

पाचोरा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

 

 

 

 

 

 

येथील जि प प्राथमीक शाळा भातखंडे, प्राथमिक विद्यामंदिर जनता वसाहत व प्राथमिक विद्यामंदिर बाहेरपुरा आयोजित केंद्रस्तरीय शिक्षण परिषद सु भा पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे दि. २९ शुक्रवार रोजी भातखंडे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अभिजीत खैरनार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव डायट येथून निरीक्षक म्हणून आलेले विवेक साळुंखे व केंद्रातील विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. शिक्षण परिषदेत प्रतिमापूजना नंतर मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. यानंतर विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. यानंतर शिक्षण परिषदेतील चर्चेच्या विषयांमधील देवाणघेवाण या विषयावर प्राथमिक विद्यामंदिर जनता वसाहत येथील श्रीमती ममता पाटील व श्रीमंती साळुंखे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. माझा वर्ग माझे नियोजन या विषयावर प्राथमिक विद्यामंदिर बाहेरपूरा येथील श्रीमती आशा परदेशी व श्री रवींद्र हटकर यांनी मार्गदर्शन केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रप्रमुख श्री अभिजीत खैरनार यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करत विद्यार्थी पोर्टफोलिओ, पॅट परीक्षेचे गुणांकन, निरक्षर सर्वे, शाळा स्तरावरील विविध समित्या, विद्यार्थी सुरक्षा, विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर व अध्ययन निश्चिती, आदी विषयांवर मार्गदर्शन करत शिक्षकांशी संवाद साधला. यानंतर शालेय कामकाजाविषयी अनौपचारिक चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि प शाळा भातखंडे येथील श्री विनोद पाटील सर यांनी तर आभार प्रदर्शन सौ वंदना पाटील यांनी केले.