भडगाव तालुक्यातील बांबरुड बुद्रुक येथील शेतकरी अशोक सदाशिव पाटील यांचे शेतात लिंबुच्या बागामध्ये लिंबू चोरी करताना पकडले रंगेहात 

भडगाव तालुक्यातील बांबरुड बुद्रुक येथील शेतकरी अशोक सदाशिव पाटील यांचे शेतात लिंबुच्या बागामध्ये लिंबू चोरी करताना पकडले रंगेहात

 

 

भडगाव तालुक्यातील बांबरुड बुद्रुक येथील शेतकरी अशोक सदाशिव पाटील यांचे शेतात दिनांक 04 एप्रिल 2025 रोजी 7.00 वाजेच्या सुमारास शेतातील लिंबुच्या बागामध्ये लिंबू चोरी होत असल्याची माहिती त्यांना मिळताच भट्टगाव शिवारातील गट नं. 38/1 मध्ये त्यांनी प्रत्यक्ष जावून पाहीले तेव्हा त्याठिकाणी गावातील इतर शेतकरीही जमलेले होते, अशोक पाटील व जमलेले इतर सर्वजन त्यांचे शेतात लिंबाच्या बागात घुसुन पाहीले असता त्यांना गावातीलच मनोज पाटील हा लिंबाच्या बाग मध्ये 20 किलो लिंबु तोंडुन एका थैलीमध्ये घेवुन बसलेला दिसल्याने गावातील जमलेल्या लोकांनी त्यास पकडुन ताब्यात घेऊन विचारपूस केली असता माझ्या जवळ असलेली मोटसायकल एचएफ डिलक्स ही लिंबाच्या बागाच्या बांधावर लावलेली आहे तसेच माझ्या सोबत प्रकाश पाटील हा देखील होता त्याच्या ताब्यात 80 किलो लिंबुची थैली होती, तो तुम्हाला बघुन लिंबुची ती थैली घेवुन पळुन गेला असे त्याने सांगितल्याने शेतकरी अशोक पाटील व गावातील जमलेल्या लोकांनी त्यास व त्याच्या जवळ असलेली मोटर सायकल भडगाव पोलीस स्टेशनला आणली,

यात 10,000 रुपुये किमतीचे 100 किलो लिंबू चे शेतकरी अशोक पाटील यांच्या मालकीचे नुकसान झाले आहे अशी फिर्याद शेतकरी अशोक पाटील यांनी भडगाव पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून संशयित मनोज पाटील व प्रकाश पाटील या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर घटने स्थळावरून 2000 रुपये किमतीचे 20 किलो लिंबू व 2500 हजार रुपये किमतीची मोटरसायकल भडगाव पोलीस स्टेशनला आणण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल मनोहर पाटील हे करीत आहेत.

सदर माहिती आज दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता हाती आली आहे.