नांद्रा माध्यमिक विद्यालयात शेंदुर्णी संस्था वर्धापन दिन संपन्न

नांद्रा माध्यमिक विद्यालयात
शेंदुर्णी संस्था वर्धापन दिन संपन्न

पाचोरा तालुक्यातील अप्पासाहेब पी.एस.पाटील.माध्यमिक विद्यालय नांद्रा येथे धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को अॉप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी संस्थेचा ७७वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.क्रार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष डॉ वाय जी पाटील होते.
उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील,पो.पा किरण वसंतराव तावडे.ग्रामपंचायत सदस्य किशोर प्रकाश खैरनार,आत्माराम सिताराम पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष त्र्यंबक पाटील, स्विकृत सदस्य नंदकुमार नारायण बागुल, सामाजिक कार्यकर्ते विनोद बाबुराव पाटील,पत्रकार राजेंद्र भगवान पाटील,भारत धनसिग पाटील (वरसाडे) विलास चुडामन पाटील (पहाण) विश्र्वनाथ सुर्यवंशी, मुख्याध्यापक आर. एस. चौधरी आदि.
सुरवातीला आचार्य बापुसाहेब गजाननराव गरुड दंत्तमंदीर सरस्वती अण्णासाहेब भास्करराव गरुड प्रतिमांचे मान्यवरांचा हस्ते पुजन करण्यात आले.
सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
क्रार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक आर एस चौधरी यांनी संस्थेचा आलेख व वाटचाल बाबत भुमिका मांडली.
विद्यार्थी मनोगत घनश्याम बाविस्कर,अक्षय रामकृष्ण पाटील.मत व्यक्त केले.
शिक्षकांच्या वतिने एल एम पाटील. जे डी पाटील.व मान्यवर विनोद बाबुराव पाटील.भारत धनसिंग पाटील.यांची समयोचीत मनोगत व्यक्त केले.
सदर प्रसंगी एन एम एम एस परीक्षा उत्तीर्ण बदल कुमारी साधना दिपक पवार डॉ वाय जी पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संस्थेबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे.एस एस सी निकालाची परंपरा कायम ठेवन्याचे विद्यार्थ्यांना आव्हान केले.
सुत्रसंचलन जी ए ठाकूर यांनी केले.
शेवटी आभार पी ए पाटील यांनी मानले.क्रार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांना परिश्रम घेतले. फोटो ……..नांद्रा (ता.पाचोरा ) येथील धी.शेंदूर्णी एज्युकेशन च्या 77व्या वर्धापणा प्रसंगी संस्थेचा आलेख प्रास्तविकातुन मांडतांना मुख्यध्यापक आर.एस.चौधरी व व्यासपीठ.