पाचोऱ्यात गणेश भक्तीला नवा रंग -शिंदे फार्मसी उजळले “ऑपरेशन सिंदूर” थीमने
पाचोरा येथे स्थित असलेल्या गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च,पाचोरा या महाविद्यालयात दिनांक 27/08/2025 वार बुधवार रोजी गणेश चतुर्थी निमित्त गणपती स्थापना करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पाची थीम आगळीवेगळी आहे ह्या वर्षी आता नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याची कौशल्य व देशाप्रती असलेले प्रेम व पहलगाम येथे झालेला भ्याड हल्ला असा एक देखावा विद्यार्थी व प्राध्यापकांनी बनवला आहे. हा देखावा शासनाच्या “ऑपरेशन सिंदूर” या मोहिमेचा भाग म्हणून विशिष्ट आकर्षण ठरत आहे.
दिनांक 27 रोजी सकाळी दहा वाजेला प्राचार्य डॉ. मनोज दिलीप पाटील यांनी गणरायाला व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मिरवणूक काढली त्यामध्ये विद्यार्थी व प्राध्यापक रुंद ढोल ताशा वरती थिरकले. संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांनी गणरायाची स्थापना केली संस्थेचे सेक्रेटरी जे.डी. काटकर, सहसचिव श्री शिवाजी शिंदे,संस्थेचे उपाध्यक्ष श्री नीरज मुनोत व शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉक्टर विजय पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक केले.