सोयगावात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष — बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाचा आनंद उत्साहात साजरा
दत्तात्रय काटोले
सोयगाव : बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासह महायुतीतील मित्रपक्षांना मिळालेल्या प्रचंड बहुमताच्या पार्श्वभूमीवर सोयगाव शहरात आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाच्या वतीने फटाके फोडून उत्स्फूर्त जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई वाटून विजयाचा आनंद व्यक्त केला.
या विजय उत्सव प्रसंगी भाजपाचे जिल्हा चिटणीस सुनिल गावंडे, ज्येष्ठ नेते वसंत आप्पा बनकर, शहराध्यक्ष मंगेश सोहनी, ता.ख.वि.संघ संचालक मयुर मनगटे, तसेच प्रमोद पाटील, संजय चौधरी, बापू काळे, सुनील ठोंबरे, संजय आगे, जयेश पाटील, राहुल परदेशी, अस्लम पिंजारी, थोटे, सुदाम कल्याणकर, सचिन राठोड, मंगेश तेली आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपाच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून आगामी काळात पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

























