सामनेर येथील महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत तृतीय क्रमांक

सामनेर येथील महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत पाचोरा तालुक्यातील तृतीय क्रमांक मिळाला

पाचोरा ( प्रतिनिधी)

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत, पाचोरा तालुक्यातून महात्मा गांधी विद्यालय सामनेर या शाळेला तृतीय क्रमांक मिळाला. या कार्यक्रमाचे आयोजन सरदार एस. के. पवार माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथे माननीय गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. पारितोषिक वितरण माननीय गटविकास अधिकारी साहेब यांच्या हस्ते मुख्याध्यापक श्री आर.आर.भोसले सर , महात्मा गांधी विद्यालय सामनेर यांचे प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील पाचोरा तालुक्यातील केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधू उपस्थित होते. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे मानद सचिव, चेअरमन सो., व्हाइस चेअरमन सो. तसेच सामनेर शाळेचे स्कूल कमिटी चेअरमन बाळकृष्ण पाटील, संचालक मंडळ यांनी महात्मा गांधी विद्यालयातील मुख्याध्यापक श्री आर. आर. भोसले सर तसेच सर्व शिक्षक बंधू व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. तसेच सामनेर केंद्रातील केंद्रप्रमुख धीरज पाटील सर यांनी अभिनंदन केले व त्यांचे विशेष मार्गदर्शन लाभले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.