सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन आज दिनांक 1/05/2022 रोजी पाचोरा येथील विविध शासकिय कार्यलयात झेंडावंदना नंतर “सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर ” कार्यक्रमातंर्गत राज्यभरात जिल्हास्तरापासुन ते ग्रामस्तरा पर्यंत समाजकल्याणच्या योजनांच्या घडीपञिका वाटप व वाचन होत आहे. पाचोरा येथील तहसिल कार्यलय,उपविभागीय कार्यालय,पोलिस स्टेशन,नगरपालिका विविध शासकिय विभागात घडी पञिका देण्यात आल्या.तत्पुर्वी पंचायत समिती येथे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या शैक्षणिक ,आर्थिक ,सामाजिक उन्नती व्हावी यासाठि समाजकल्याण,बार्टि व महामंडाळा मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचे वाचन करण्यात आले.या प्रसंगी गटविकास अधिकारी अतुल पाटिल समाजकल्याण तालुका समन्वयक अनिल पगारे ,पंचायत समिती पाचोराचे कार्यालय अधिक्षक टेकाडे सर,डि.एस.सुरवाडे,राजेन्द्र धस,सुनिल पाटिल,ईश्वर देशमुख,विजय साळवे तसेच अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक योजनांचा जागर कार्यक्रमातंर्गत समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी प्रांतधिकारी बांदल साहेब,तहसिलदार कैलास चावडे साहेब,पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटिल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन योजनांची घडीपञिका दिली.समाजकल्याण योजनांचा जागर कार्यक्रम समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.