महिला दिनाचे औचित्य साधून पाचोरा शहर पद्मवंशीय तेली समाज महिला व पुरुष मंडळाचा स्नेहमिलन

महिला दिनाचे औचित्य साधून पाचोरा शहर पद्मवंशीय तेली समाज महिला व पुरुष मंडळाचा स्नेहमिलन

तथा हळदीकुंकू, कोरोना योद्धा सत्कारसोहळा हा अप्रतिम, अफलातून, अदभुत असा होता.या नेत्रदीपक सोहळ्याचे वैशिष्टे पुढीलप्रमाणे.
सौ प्रतिभा सुनील तेली सौ चारुशीला मुकेश तेली तसेच सन्माननीय सुनील तेली सर तसेच प्रा. अमोल झेरवाल सर, ज्ञानेश्वर पाचोळे सर यांनी केलेल्या उत्कृष्ट असं सूत्रसंचालन केले.
डॉ स्वाती प्रशांत तेली, प्रा.गायत्रीअमोल झेरवाल यांचे स्री. सबलीकरण वरील जबरदस्त मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर अण्णासो डॉ आर.बी तेली,अध्यक्ष डॉ शांतीलाल तेली, युवा अध्यक्ष.संदीप भाऊ सरताळे तसेच सन्मानिय सहकोषाध्यक्ष.श्री. संजय झेरवाल सरजी, डॉ मुकेश तेली,हेमंत तेली, डॉ सिद्धांत तेली, डॉ घनश्याम चौधरी, डॉ राहुल झेरवाल उपस्थित होते, या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी उत्कृष्ट मार्गदर्शनकेले. श्री ज्ञानेश्वर पाचोळे सर यांनी आभार प्रदर्शन केले.
डॉ.प्रशांत तेली यांनी दिलेले चविष्ट भोजन तसेच सन्माननीय रघुनाथ चौधरी यांनी दिलेले वान साहित्य वाटप केले.
विशेष आकर्षण पुढील तीन वर्ष अन्नदान व वान साहित्य देणार्‍यांची नावे बुक..
पाचोरा शहर पुरुष कमिटी तसेच महिला कमिटी, पाचोरा तील सर्व समाज बांधवांचे सहकार्य लाभले.
निसर्गरम्य वातावरण, उत्कृष्ट व्यवस्थापन..छान असे नियोजन मुळे स्नेहमिलन तथा हळद-कुंकू सोहळा सर्वांच्या सहकार्याने यशस्वी ठरला…