श्री गो.से हायस्कूल पाचोरा येथे मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी

श्री गो.से हायस्कूल पाचोरा येथे मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी

 

 

पाचोरा( प्रतिनिधी ) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से हायस्कूल पाचोरा येथे आज दिनांक 29/8/2025 शुक्रवार रोजी हॉकीचे जादूगार व क्रीडा क्षेत्रात अलौकिक कार्य केलेले हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

यानिमित्ताने विद्यालयाचे मुख्याध्यापक .एन. आर.पाटील, उपमुख्याध्यापक आर.एल.पाटील. पर्यवेक्षिका सौ.अंजली गोहिल.,आर.बी. तडवी.व आर.बी.बंठिया.यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार

माल्यार्पण करण्यात आले.

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस “भारतीय क्रीडा दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मैदानावरील क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका अंजली गोहिल. व .आर.बी. तडवी.यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. विद्यालयातील क्रीडा शिक्षक एस.पी.करंदे, संदीप मनोरे.यांनी विद्यार्थ्यांना विविध खेळांची माहिती व मार्गदर्शन केले. या निमित्ताने कबड्डी व व्हॉलीबॉल या स्पर्धा घेण्यात आल्या व विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.

वरील कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक- शिक्षिका तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.