बहुचर्चीत पाचोरा वृंदावन हॉस्पीटल प्रकरणी 156(3) अन्वये तक्रारदार न्यायालयात

बहुचर्चीत पाचोरा वृंदावन हॉस्पीटल प्रकरणी 156(3) अन्वये तक्रारदार न्यायालयात

पाचोरा- शहरातील पाचोरा बायपास हायवे रेल्वे उड्डान पुल लगत असलेले तारखेडा-गाळण रोडनजीक असलेले डॉ. विजय पाटील, डॉ. निळकंठ पाटील संचलीत वृंदावन हॉस्पीटल प्रकरणी माहीजी येथील रहिवाशी . फुलचंद धनराज बडगुजर यांनी आपला मुलगा किशोर याचे चुकीचे निदान केल्याबाबत व चुकीच्या निदानाचे पैसे उकळल्याबाबतची पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार देऊन कारवाई करण्या संदर्भात विनंती केली परंतु पोलीसांनी आरोपी विरुध्द काहीएक कारवाई केली नाही म्हणून तक्रार श्री बडगुजर यांनी
पाचोरा येथील मे. ज्युडी. मॅजि. यांचे कोर्टात CRPC 156 (3)
केस.क्र.53/2023 दावा दाखल केला आहे
यात फिर्यादी श्री. फुलचंद धनराज बडगुजर वय-४१, धंदा-मजुरी, रा. माहेजी, ता. पाचोरा जि. जळगांव यांनी
वृंदावन हॉस्पीटलचे संचालक डॉ. विजय नरहर पाटील व डॉ. निळकंठ नरहर पाटील यांच्या विरोधात मे. पाचोरा न्यायालयात दाखल केलेल्या
भा.दं.वि. का. कलम ४२०, ४६८, ५०६ व ३४ प्रमाणे दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की
माझा मुलगा किशोर फुलचंद बडगुजर यास १९/०१/ २०२३ चे रात्री पोटात दुखत असल्याने पाचोरा येथील वृंदावन हॉस्पीटल येथे दाखल केल्यानंतर वृंदावन हॉस्पीटलचे संचालक डॉ. विजय नरहर पाटील यांनी दि.२०/०१/२०२३ रोजी दुपारी १.०० वाजता त्यांच्याच हॉस्पीटल मधील डॉ. पियुश दांडगे
यांचेमार्फत सोनोग्राफी करुन घेतली व मला डॉ. विजय पाटील यांनी. त्यांचे कॅबीन मध्ये बोलावून घेतले त्यावेळेस वृंदावन हॉस्पीटलचे संचालक डॉ. विजय नरहर पाटील व डॉ. निळकंठ नरहर पाटील हे दोघेही तेथे हजर होते त्यावेळी वरील दोन्ही डॉक्टरांनी मला व माझ्या पत्नीला सांगीतले की, तुमच्या मुलाला अपेन्डीक्स चा त्रास असुन त्याचे तात्काळ ऑपरेशन करावे लागेल. ऑपरेशन न केल्यास अपेंन्डीक्स फुटून त्याचे तुमच्या मुलाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल म्हणुन वेळ न दवडता तुम्ही मुलाचे तात्काळ ऑपरेशन करुन घ्या. त्यासाठी तात्काळ तुम्ही २०,०००/- रुपये अॅडव्हॉन्स जमा करुन घ्या तसेच आम्ही ऑपरेशन साठी तुम्हाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देखील मिळवून देवु. त्यासाठी तुम्ही तुमचे राशनकार्ड घेवुन या व तुम्ही रिपोर्टचे व दवाखान्यात अॅडमिट केल्याबद्दलचें फी म्हणुन रक्कम रुपये ५०००/- तुम्ही काऊन्टरवर जमा करा व राशनकार्ड घेवुन या, आरोपींच्या सांगीतल्याप्रमाणे मी सोनोग्राफी म्हणुन ९००/- रुपये व अॅडमिशन फि म्हणुन रुपये २०००/- जमा करुन दिलेली आहे पैकी त्यांनी मला ९००/- रुपये चीच पावती दिलेली आहे.
माझ्या मुलाचे पोटात दुखत होते परंतु त्यास या आधी कधीही अपेंन्डीक्सचा ञास झालेला नसल्याने शंका आल्याने मी माझ्या मुलाला शोभा हॉस्पीटल जळगांव येथे तपासणी करण्यासाठी घेवुन गेलो डॉ. योगेश चौधरी यांनी दि.२०/०१/२०२३ रोजी माझ्या मुलाची जळगांव येथीलच समर्थ डायग्नोस्टीक सेंटर येथे सोनोग्राफी मार्फत पुन्हा तपासणी केली असता, माझ्या मुलाची अपेन्डींक्स नॉर्मल असल्याबाबत अहवाल दिला व तुमच्या मुलास पोटात अल्सरचा त्रास असुन त्याचे अल्सरचे ऑपरेशन करावे लागेल. असे सांगीतले त्यानंतर मी माझ्या मुलास पुन्हा सिव्हील हॉस्पीटल जळगांव येथे घेवुन गेलो व तेथे पुन्हा चेकअप केले असता, माझे मुलाचे पोटात अल्सरचा त्रास असल्याचे सिध्द झाले त्यामुळे मी माझे मुलाचे सिव्हील • हॉस्पीटल जळगांव येथे अल्सरचे ऑपरेशन करुन घेतले.
मी वृंदावन हॉस्पीटलचे संचालक डॉ. विजय नरहर पाटील व डॉ. निळकंठ नरहर पाटील यांना प्रत्यक्ष भेटुन तुम्ही माझ्या मुलाचे चुकीचे निदान केले व माझ्याकडुन चुकीच्या निदानापोटी रक्कम रुपये २०००/- घेतलेली असुन माझी फसवणुक केल्याबात बोललो असता
वृंदावन हॉस्पीटलचे संचालक डॉ. विजय नरहर पाटील व डॉ. निळकंठ नरहर पाटील
यांनी मला धमकावले की, “तु आमचे विरुध्द काही कारवाई केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील, आम्ही तुला पाहुन घेवु” अशी धमकी दिली की, “आमचे विरुध्द काही कारवाई केलीच तर याद राख, तुला कुठे जायचे तर जा, आम्ही पाहुन घेवु” अशी धमकी दिली वृंदावन हॉस्पीटलचे संचालक डॉ. विजय नरहर पाटील व डॉ. निळकंठ नरहर पाटील यांनी माझा विश्वासघात करुन फसवणुक केलेली आहे व फसवणुकीसाठी चुकीचे व बोगस दस्ताऐवज तयार केलेले आहेत व मी त्याबाबत जाब विचारला असता पाहुन घेण्याची धमकी दिलेली आहे.
वृंदावन हॉस्पीटलचे संचालक डॉ. विजय नरहर पाटील व डॉ. निळकंठ नरहर पाटील यांच्या बेकायदेशीर कृत्याविरुध्द दि.०१/०२/२०२३ रोजी मी पाचोरा पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी यांना लेखी तक्रार देवुन आरोपीविरुध्द धमकवल्याबाबत व चुकीचे निदान केल्याबाबत व चुकीच्या निदानाचे पैसे उकळल्याबाबतची लेखी तक्रार देवुन कारवाई करण्या संदर्भात विनंती केली परंतु पोलीसांनी आरोपी विरुध्द काहीएक कारवाई केली नाही म्हणुन दि. ०३/०२/२०२३ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा यांचेकडे लेखी तक्रार देवुन आरोपीविरुध्द कारवाई करण्याची मागणी केली परंतु पोलीसांनी आरोपीविरुध्द काहीएक कारवाई केलेली नाही. तसेच सदरच्या पत्राची एक प्रत मी जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालय जळगांव यांना देखील दिलेली आहे. परंतु आरोपीविरुध्द काहीएक कारवाई झालेली नाही. संबधीत पोलीस स्टेशनला जावुन मी प्रभारी अधिकारी यांना वारंवार विनंती करुन व अर्ज देवुन देखील पोलीस अधिकारी यांनी आरोपीविरुद कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असुन देखील पोलीसांनी आरोपीविरुध्द अदयाप पावतो कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. माझी तक्रार दखलपात्र स्वरुपाची असतांना देखील त्याकडे हेतुतः दुर्लक्ष करुन
वृंदावन हॉस्पीटलचे संचालक डॉ. विजय नरहर पाटील व डॉ. निळकंठ नरहर पाटील यांना सहाय्य होईल असे कृत्य केलेले आहे. वास्तविकतः दखलपात्र गुन्हयामध्ये आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असतांना फिर्यादीची फिर्याद नोंदुन घेतलेली नाही. व कायदयाने अभिप्रेत असलेल्या कर्तव्यात कसुर करुन आरोपीस सहाय्य होईल असे कृत्य केलेले आहे. म्हणुन फिर्यादीने पाचोरा मे. कोर्टात केस दाखल केली आहे. सोबत अवलोकनासाठी माझ्या मुलाचे वैदयकीय उपचार व निदान संदर्भातील सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्सप्रती दाखल केलेल्या आहेत.
आरोपी विरुध्द सि.आर.पी.सी. १५६ (३) प्रमाणे चौकशीचे आदेश करण्यात यावा व फिर्यादीच्या हिताचे इतर योग्य ते हुकूम होणेसाठी फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी फुलचंद धनराज बडगुजर यांच्या तर्फे संभाजीनगर उच्च न्यायालयाचे विधी तज्ञ अँड. हर्षल रणधिर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा येथील
अँड. मंगेश गायकवाड काम पहात आहेत