“राखीच्या नात्याने घट्ट झाले ऋणानुबंध” — कै. पु. का. पाटील संचालित गुढे साई समर्थ माध्यमिक विद्यालय पथराडचा उपक्रम

“राखीच्या नात्याने घट्ट झाले ऋणानुबंध” — कै. पु. का. पाटील संचालित गुढे साई समर्थ माध्यमिक विद्यालय पथराडचा उपक्रम

 

पथराड (ता. भडगाव) : कै. पु. का. पाटील संचालित गुढे साई समर्थ माध्यमिक विद्यालय पथराड येथे रक्षाबंधन निमित्त अनोखा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने प्रेमाने व कलात्मकतेने तयार केलेल्या रक्षाबंधनाच्या राख्या लिफाफ्यात सीलबंद करून शिक्षकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी पाठविण्यात आल्या. या उपक्रमाला *“ऋणानुबंध”* असे नाव देण्यात आले.

 

या राख्या गुढे पोस्ट ऑफिस, प्राथमिक आरोग्य केंद्र गुढे, बडोदा बँक गुढे, तसेच पोलिस स्टेशन, झेड. पी. शाळा, आणि संस्थेच्या इतर शाखांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. त्या शाखांमधील मुख्याध्यापकांनी सुद्धा भावनिक आभार व्यक्त केले.

 

*विशेषतः एका फौजी जवानाकडे राखी पोहोचल्यावर, त्याच्याकडे त्या क्षणी आई आणि बहीण नसल्याने त्याचे डोळे पाणावले. भावनिक अश्रूंनी त्याने विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला. हा क्षण सर्वांच्या मनात घर करून गेला.*

 

संस्थेचे चेअरमन आदरणीय भैय्यासाहेब पाटील यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांनी गोरगरिबांच्या आणि वस्तीवरील, तांड्यावरील, पाड्यावरील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्था स्थापन करून ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला आहे.

 

मुख्याध्यापक व शिक्षकांनी समन्वयातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. सर्व संस्थांनी व अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.