जि.प.उर्दू शाळेत मतदान जनजागृती कार्यक्रम

जि.प.उर्दू शाळेत मतदान जनजागृती कार्यक्रम

जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे मौलाना आझाद हॉल येथे, मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आला. भारत सरकार मार्फत SVEEP(स्वीप )कार्यक्रम अंतर्गत मतदान जनजागृतीच्या तो एक अंग होता. कार्यक्रम मध्ये मुख्य अतिथी म्हणून नायब तहसीलदार सुभाष रघुनाथ कुंभार, गटशिक्षणाधिकारी पाचोरा पंचायत समिती समाधान पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी उपस्थित लोकांचे मार्गदर्शन केले. 13 मे 2024 रोजी होणारे मतदान मध्ये प्रत्येक मतदातांनी आपल्या मताचे हक्काच्या वापर करावा व भारताचे लोकशाहीचा अंग बनवा, असे आवाहन केले. प्रत्येक शनिवार पोस्टर व बॅनरच्या वापर करून, प्रभात फेरी काढावी, सुट्टीच्या काळामध्ये ही मतदान जनजागृती साठी पालकांचे संपर्क मध्ये राहावे, असे आदेश दिले. यावेळी संबंधित मतदान केंद्रीय अधिकारी (BLO) वसीम शेख,अशपाक शाह ,नाजिम खान, तोफिक सय्यद,शेख जावेद रहीम उपस्थित होते. कार्यक्रम मध्ये केंद्रप्रमुख शेख कदीर शब्बीर, मुख्याध्यापक अब्दुल एजाज, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसीम खान, इतर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक वर्ग, पालक वर्ग मोठी संख्या मध्ये उपस्थित होते. केंद्रप्रमुख शेख शब्बीर यांनी मतदान जनजागृती अजून तीव्र बनवण्याचे आश्वासन केले. शेख जावेद रहीम यांनी आभार व्यक्त केले.