चार हजारची लाच भोवली ग्रामसेवक सह पॅंटर ला आटक ॲन्टी करप्शन ब्युरोची कार्यवाही

चार हजारची लाच भोवली ग्रामसेवक सह पॅंटर ला आटक ॲन्टी करप्शन ब्युरोची कार्यवाही

काशिनाथ राजधर सोनवणे, वय-52, व्यवसाय-नोकरी,
ग्रामसेवक,ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा.
ता.पाचोरा जि.जळगाव वर्ग-३
रा.प्लॉट नं.३, शिवनेरी नगर,भडगाव रोड, चाळीसगाव ता.चाळीसगाव जि.जळगांव.
शिवदास भुरा राठोड, -67, खाजगी इसम (वरसाडे प्र.पा.ग्रामपंचायतीचे महिला सरपंच यांचे पती) रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा, जि.जळगाव.

तक्रारदार हे ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. अंतर्गत होणाऱ्या रोजगार हमी योजने अंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवक म्हणून काम केले असून त्यांचे मिळणारे मानधनाच्या धनादेशावरती सही देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे क्रं.1 यांनी स्वतःसाठी व आरोपी क्रं.2 यांचेसाठी प्रथम पंचासमक्ष 6,000/-रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 4,000/-रुपये लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम आरोपी क्रं.2 यांचेकडेस देण्यास सांगितल्याने सदर लाचेची रक्कम आरोपी क्रं.2 यांनी स्वतः पंचासमक्ष व आरोपी क्रं.1 यांच्या समक्ष ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. कार्यालयात स्वीकारली म्हणून गुन्हा.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी-
श्री.शशिकांत एस.पाटील, पोलीस उप अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो,जळगाव
तपास अधिकारी-
श्री.संजोग के.बच्छाव , पोलीस निरीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव.
सापळा व मदत पथक-
DYSP. श्री.शशिकांत एस.पाटील, PI.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ.