अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा आमदार अनिलदादा पाटील यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी महिला आघाडी च्या महिला पदाधिकारी यांची नियुक्ती पत्र वाटप व नवनियुक्त महिला पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ संपन्न !!

अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा आमदार अनिलदादा पाटील यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी महिला आघाडी च्या महिला पदाधिकारी यांची नियुक्ती पत्र वाटप व नवनियुक्त महिला पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ संपन्न !!

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.वंदनाताई चौधरी यांची प्रमुख उपस्थिती

जळगाव प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या खा.सुप्रियाताई सुळे यांच्या आदेशानुसार काल दिनांक ८ आॕगस्ट रोजी अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते तथा आमदार अनिलदादा पाटील यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.वंदनाताई चौधरी यांच्या शुभहस्ते महिला आघाडी कार्यकारणी पदाधिकारी यांचे नियुक्ती पत्र देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

” गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शाखा ” हा संकल्प व निश्चय ठेऊन राष्ट्रवादी पक्षप्रमुख मा.पवारसाहेब यांचे विचार गावागावात पोहचवुन सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्नांना न्याय देण्यासाठी महिला आघाडी पदाधिकारी यांनी कार्य करावे असे राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार अनिलदादा पाटील या सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलले.

१५ महिला पदाधिकारी यांच्या नवीन नियुक्त्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.वंदनाताई चौधरी यांनी केल्या.

त्या १५ नवनियुक्त महिला पदाधिकारी यांचे सत्कार व नियुक्ती पत्र राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.हा सत्कार समारंभ आमदार अनिलदादा यांच्या निवासस्थानी झाला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई,तिलोत्तमा ताई व इतर महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.