जारगाव उर्दू शाळेत आमदारांच्या अध्यक्षतेत “एक पेड मा के नाम”कार्यक्रम साजरा

जारगाव उर्दू शाळेत आमदारांच्याअध्यक्षतेत”एक पेड मा के नाम”कार्यक्रम साजरा

 

गोराडखेडा उर्दू केंद्र व शिक्षक सेना पाचोरा यांचे संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद उर्दू शाळा जारगाँव तालुका पाचोरा येथे महाराष्ट्र राज्यात राबवलेला जाणारा कार्यक्रम एक पेड मा के नाम उपक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किशोर आप्पा पाटील आमदार भडगाव पाचोरा मतदारसंघ हे उपस्थित होते. मुख्य अतिथी म्हणून सुमित किशोर पाटील, पाचोरा मार्केट कमिटी सभापती गणेश पाटील, केंद्रप्रमुख कदिर शब्बीर,शिक्षक सेना जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील, शिक्षक सेना जिल्हा संघटक विजय ठाकूर, ग स संचालक श्री विपीन पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना केंद्रप्रमुख शेख कदीर शब्बीर यांनी मांडली.शिक्षक सेना जिल्हा संघटक विजय ठाकूर यांनी वाढती जागतिक उष्णता मध्ये वृक्षरोपणचे महत्व दाखवून बदलत्या हवामान व वातावरण मध्ये जागतिक उष्णता व तापमान कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला एक वृक्ष लावण्यासाठी आव्हान केले. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपले अध्यक्षीय भाषणात सांगितले की जर अशाच प्रकारे जागतिक उष्णता वाढत राहिली तर ग्लेशियस पिघळणे, नद्यांची दिशा बदलणे, मान्सून पॅटर्न व हवामान मध्ये बदल होणे, जागतिक उष्णता वाढणे, जसे गंभीर प्रकार आपल्या पृथ्वीवर होऊ शकतात. ज्याचाभयानक परिणाम मानवीय जीवनात होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीने आपापली जबाबदारी समजून एक पेड मा के नाम प्रमाणे झाडे लावण्याचे आवाहन त्यांनी केले.आजची परिस्थिती अशी आहे की ग्लोबल लीडर्स G7,G20,BRICS SUMMIT,पॅरिस एग्रीमेंट शिखर संमेलन मध्ये सर जोडून ग्लोबल हिट कशी कमी करता येईल याच्यावर उपाय शोधणे मध्ये व्यस्त आहे.सस्टेनेबल युज(टिकाऊ वापर) चा उदाहरण देऊन त्यांनी आवाहन केले की आपण नैसर्गिक संसाधन व विकास संपत्तीच्या तितकाच वापर करावा जितकी आपली आवश्यकता आहे आणि बाकी नंतर येणारी जनरेशन साठी वाचवून ठेवावी.पाचोरा तालुक्यात जिल्हा परिषद उर्दू शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेत केलेली उत्कृष्ट कार्य बद्दल किशोर पाटील यांनी शिक्षकांचे तोंड भरून कौतुक केले. गोराडखेडा उर्दू केंद्रामध्ये शिष्यवृत्ती मध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा, कुरंगी उर्दू, अंतुरली उर्दू, जाररगाव उर्दू व तेथे कार्य करून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले.माझे भडगाव पाचोरा मतदार संघात मी एकही उर्दू शाळा एक शिक्षकी ठेवलेली नाही.प्रत्येक शाळेवर शिक्षक उपलब्ध होतील याचा मी सदैव प्रयत्न केलेला आहे व करणार आहे.तालुक्यात शिष्यवृत्ती उत्तीर्ण करणारे सात विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन गुणगौरव केले. कार्यक्रमाचे अंतिम टप्प्यात प्रत्यक्ष उदाहरण देऊन आमदार किशोर पाटील यांनी आपली आई स्वर्गीय नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे नावावर एक वृक्ष लावला.शेवटी मान्यवरांचे हस्ते शाळेचे आवारात वृक्ष रोपण कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी मुख्याध्यापक आसिफ जलील,सलमान शौकत, समीना शेख, मलिक हुमा,सना मॅडम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी परिश्रम घेतले. आभार व सूत्रसंचालन शेख जावेद रहीम यांनी प्रस्तुत केले. कार्यक्रम मध्ये मोठी संख्या मध्ये पालक उपस्थित होते. कार्यक्रम मध्ये ग्रामपंचायत सदस्य मुख्तार बागवान,अकबर बिल्डर, जावेद शेख, तालीब कुतुबुद्दीन, हमीद शाह, सिराज सर,राजू शेख, विपीन पाटील, रशीद मणियार, फारुक खान, अल्ताफ मणियार, शेख वसीम, ग्राम सेवक गोराडे आप्पा, समीर बागवान, मान्यवर उपस्थित होते.