गाडी घुंगराची घेऊनी, बंधुमाझा येईल ग… भट्टीच्या सणाला, मला मढीला नेईल ग… महाराष्ट्रातील पहिली होळी मढीच्या कानिफनाथ गडावर पेटली!

गाडी घुंगराची घेऊनी, बंधुमाझा येईल ग… भट्टीच्या सणाला, मला मढीला नेईल ग… महाराष्ट्रातील पहिली होळी मढीच्या कानिफनाथ गडावर पेटली!

(सुनिल नजन” चिफ ब्युरो” अहमदनगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ महाराज गडावर महाराष्ट्रातील पहिली होळी पेटवून भट्टीचा सण साजरा करण्यात आला. या सणाला सुमारे पाचशे वर्षां पूर्वी पासूनची ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. मढी येथील कानिफनाथ महाराज गडावर कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, पुजारी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक भक्त यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करून रात्री नऊ वाजता ही होळी पेटवण्यात आली.यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपुर्ण गावात या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा बेत आयोजित करून आपल्या मित्र मंडळीना आणि पाहुण्यांना आमंत्रित केले जाते.गडावरील होळीला महानैवेद्य अर्पण करून आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार केला जातो. संपूर्ण मढी गावातील कुटुंबातून गडावरील होळीला गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या घेऊन येतात.तेथे कानिफनाथाच्या जयघोषात होळी पेटवली जाते आणि घरोघरी जाऊन आलेल्या पाहुण्यांचा सहभोजन दिले जाते. नंतर संपूर्ण गावात पाडव्या पर्यंत तळलेले पदार्थ केले जा नाहीत.शेत नांगरणी, लग्न समारंभा सह अनेक कामे वर्ज्य केले जातात.नाथांच्या समाधीला पंचमीच्या तिथीला तेल लावून पुजा केली जाते मग हे नियम पाळले जातात.पुर्वीच्या काळी मढीतील सासरी गेलेल्या सुवासिनी या होळीच्या सणाची आवर्जून वाट पहात असत.त्यांना माहेरी जाण्याची ओढ लागलेली असते. भट्टीच्या सणासाठी माहेरी जाण्यासाठी त्या नटून थटून बसलेल्या असतात मग त्यांच्या ओठावर हे गीत दरवळ असे “गाडी घुंगराची घेऊनी, बंधुमाझा येईल ग… भट्टीच्या सणाला मला मढीला नेईल ग… सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असतात.