चोपडा महाविद्यालयात ‘पदवी काळात एम.पी.एस.सी/यू.पी.एस.सी परीक्षेची तयारी कशी करावी’ या विषयावरील कार्यशाळा उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात ‘पदवी काळात एम.पी.एस.सी/यू.पी.एस.सी परीक्षेची तयारी कशी करावी’ या विषयावरील कार्यशाळा उत्साहात संपन्न

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्र, करिअर कट्टा व द युनिक अकॅडमी, पुणे शाखा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पदवी काळात एमपीएससी/यूपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी’ या विषयावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस.कोल्हे हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते द युनिक अँकँडमी पुणे ,जळगाव शाखेचे प्रमुख श्री. विकास गिरासे व अतिथी श्री. नरेंद्र पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यशाळेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉ.आर.आर.पाटील यांनी केले तर प्रमुख अतिथींचा परिचय करिअर कट्टाचे समन्वयक वाय. एन. पाटील यांनी करून दिला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विकास गिरासे यांनी एमपीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षेच्या मुख्य व पूर्व परीक्षेचे स्वरूप, त्यांची विषयानुसार असलेली गुणांची विभागणी, अभ्यासक्रम, वयोमर्यादा तसेच अभ्यासाच्या पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना उपप्राचार्य एन.एस.कोल्हे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याविषयी जागृत असले पाहिजे तसेच आपापल्या क्षमतेनुसार आपापल्या करिअरमधील आवडीची क्षेत्रे आपण निवडली पाहिजेत’.
या कार्यक्रमाप्रसंगी सौ.एम.टी. शिंदे, डी.पी. सपकाळे, डॉ. ए.बी.सूर्यवंशी, डॉ.एम.एल. भुसारे, डी.एस.पाटील, मयूर पाटील, एन.बी.पाटील, सौ. एस. बी. पाटील, सौ.के.एस. क्षीरसागर, ए. एच. साळुंखे, डॉ.सौ. एस. एन. पाटील, सौ.पूजा पुन्नासे सौ.रूपाली साळुंखे, सौ.दिपाली पाटील, एस.जी. पाटील, बी. एच. देवरे आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहेश्वरी धनगर या विद्यार्थ्यांनीने केले तर आभार एस.बी. देवरे यांनी मानले.
या कार्यशाळेप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.