पाचोरा येथील फोकस न्युजचे संपादक सचिन (बाला) पाटील यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

पाचोरा येथील फोकस न्युजचे संपादक सचिन (बाला) पाटील यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

पाचोरा, प्रतिनिधी
पाचोरा येथील कृष्णापुरीतील रहिवाशी तथा फोकस न्युजचे मुख्य संपादक सचिन मधुकर पाटील ( बाला भाऊ ) (वय – ४५) यांचे दि. ४ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने दुःखद निधन झाले. सचिन पाटील यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांचेवर आज दि. ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता राहत्या घरी कृष्णापुरी मारोती मंदिर पासुन अंत यात्रा निघणार आहे. ते गो. से. हायस्कूलचे शिक्षक रुपेश मधुकर पाटील यांचे लहान बंधू होत. सचिन पाटील यांचे अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.