ऑलम्पिंक स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनासाठी सेल्फी पाँईटचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

ऑलम्पिंक स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनासाठी
सेल्फी पाँईटचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव दि. ८ – टोकीयो येथे २३ जुलै ते ५ सप्टेंबर, २०२१ या कालावधीत ऑलम्पिंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑलम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचे खेळाडू राही सरनोबत (पिस्तुल शुटीग), अविनाश साबळे (ॲथलेटीक्स), चिराग शेट्टी (बॅडमिटन), विष्णू सरवानन (सेलींग), तेजस्विनी सावंत (रायफल शुटींग), प्रविण जाधव (आर्चरी रिकर्व्ह), स्वरुप उन्हाळकर (पॅरा शुटींग १० मी, रायफल), सुयश जाधव (पॅरा स्विमींग), उदयन माने (गोल्फ) श्रीमती भाग्यश्री जाधव (पॅरा) ॲथलेटीक्स-गोळाफेक) हे दहा खेळाडू सहभागी होत आहेत.
या खेळाडूंना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्याकरिता ऑलम्पिक दिनाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमांचे आयोजन क्रीडा विभागामार्फत करण्यात येत आहे. राज्यातील सहभागी खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे, त्यांचे मनोबल वाढावे तसेच कोवीड-१९ प्रादुर्भाव कमी होत असताना खेळाचे वातावरण पुन्हा निर्माण व्हावे याकरिता ऑलम्पिंक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १० खेळाडूंचे फ्लेक्स, शुभेच्छा बॅनर, स्टॅंन्डी, सेल्फी पॉईन्ट इ. माध्यमाव्दारे जिल्ह्यात प्रसिध्दी करण्यात येत आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ऑलम्पिंक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे स्टॅंडी व सेल्फी पॉईन्टचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ऑलम्पिंक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित, क्रीडा अधिकारी एम. के. पाटील, क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा पाटील, विनोद माने, विनोद कुलकर्णी, सुरज पवार आदि उपस्थित होते.
00000