पाथर्डीत ओबीसींच्या रास्तारोको आंदोलना नंतर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दि ४ जानेवारी रोजी परभणी शहरात मयत सुर्यवंशी आणि हत्या झालेले मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्व पक्षीय निषेध मोर्चा काढला होता.त्या मोर्चाच्या वेळी जरांगे पाटील यांनी मोर्चातील आंदोलका समोर मोठ्या आवेशात बोलताना महाराष्ट्राचे मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या विरोधात असे वक्तव्य केले होते की” ह्या मुंड्या फुंड्याच नाव सुद्धा घेतले नाही, हरामखोर अवलादीचे” मयत संतोष देशमुख यांच्या हत्ये संदर्भातील मारेकरी आरोपींचे चार्जशीट लवकरच कोर्टात गेले पाहिजे जर कोणी आरोपी बाहेर राहीला तर “राज्याचे मंत्री धनंजय मुंडेना घरात घुसून मारू, रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही, गोट्याने हाणू “असे प्रक्षोभक आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते.त्यामुळे मराठा विरुद्ध वंजारी हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रात पेटला आहे.व मुंडे समर्थक कमालीचे आक्रमक झाले असल्याचे चित्र सर्व महाराष्ट्रात उमटले आहे .आणि त्यांचे अतिशय भयानक परीणाम संपूर्ण राज्यभर दिसून येत आहेत. काही आमदारांनी तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आडून केवळ आकसापोटी नुसते राजकारणच केले आहे.आगित तेल ओतून मुंडे समर्थकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.जरांगे पाटील यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केले आणि ना.मुंडे यांची बदनामी केली म्हणून हिंगोली, सिंदखेडराजा,केज, धारुर, परळी, अमळनेर आदी विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत त्या प्रमाणे पाथर्डी येथे ही गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून आम आदमी पक्षाचे नेते किसनराव आव्हाड, माजी सभापती संभाजी राव पालवे, युवा नेते गोकुळभाउ दौंड, माजी सरपंच संजय बडे, भगवानराव आव्हाड, नागनाथ गर्जे, नाना पडळकर, नागनाथ गर्जे, अर्जुन धायतडक,अजिनाथ गिते, मल्हारी घुले, भास्कर दराडे,गोरक्ष ढाकणे, दादासाहेब खेडकर, संतोष सारूक, सचिन पालवे, भिमराव फुंदे, यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मग नंतर सर्व आंदोलक थेट पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांच्या दालनात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून ठिय्या मारून बसले. मुटकुळे साहेब यांनी वरिष्ठांनी आदेश दिले की गुन्हा दाखल करतो असे सांगितले.तरीही आक्रमक भूमिका घेतलेले आंदोलक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.शेवटी आम आदमी पक्षाचे नेते किसनराव महादेव आव्हाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 27/2025 भारतीय न्याय संहिता कलमे 351(2),351(3),352,356(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि नंतरच आक्रमक पवित्रा घेतलेले आंदोलक निघून गेले. पुढील तपास पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब हे करीत आहेत. एकंदरीत मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष संपूर्ण राज्यभर गाजत आहे.राज्यात अजुनही जरांगे पाटील यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होताना समाज माध्यमातून दिसत आहेत.ओबिसींना त्रास द्याल तर “हम किसी से कम नहीं ” हे पाथर्डीतील ओबीसी नेत्यांनी दाखवून दिले आहे.