श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा संपन्न

श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी)
सोना हरी थोरात बहुउद्देशीय संस्था आयोजित शालेय स्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक प्रमाणपत्र मुख्याध्यापिका प्रमिला. एम वाघ व उपमुख्याध्यापक एन आर ठाकरे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र करण्यात आली. या प्रसंगी
सौ भदाणे मॅडम , रवींद्र जाधव सर, चंद्रकांत पाटील सर संगीत शिक्षक सागर थोरात सर उपस्थित होते. तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी भर भरून विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्यात
प्रथम क्रमांक: दर्शना सावकार पाटील.
द्वितीय क्रमांक: नम्रता संतोष जाधव.
तृतीय क्रमांक: प्रियंका जितेंद्र पाटील. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.