पुणे येथील सावित्री शक्तिपीठ तर्फे नानासाहेब श्रीराम महाले यांना पगडी परिधान करून त्यांचा सन्मान केला

समाजसेवा व राजकारण करताना वयाची आठ नसते आपण केलेल्या कार्याची पावती म्हणून माळी समाजाचे भूषण म्हणून श्री श्रीराम मोतीराम महाले यांच्या कार्याची दखल घेऊन पुणे येथील सावित्री शक्तिपीठ तर्फे नानासाहेब श्रीराम महाले यांना पगडी परिधान करून त्यांचा सन्मान केला

पाचोरा प्रतिनिधी
(अनिल आबा येवले) पाचोरा येथील देशमुख वाडीतील रहिवाशी श्री नानासाहेब श्रीराम मोतीराम महाले यांनी आपल्या आयुष्यात समाजासाठी व समाज हितासाठी कार्य करीत राहिले त्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या खिलाडी वृत्तीमुळे त्यांनी राजकारणात शिवसेनेतर्फे निवडणूक लढवून शिवसेना नगरसेवक पदी विराजमान झाले होते त्या काळात त्यांनी समाजाच्या कार्यासाठी व समाजाचा हितासाठी काम केले कुठल्याही स्वार्थ न बाळगता समाजसेवा हाच त्यांचा निर्धार होता श्री नानासाहेब विठ्ठल रुक्मिणी यांचे भक्त असून ते प्रत्येक दरवर्षी पायी दिंडी यात्रा करून पाचोरा ते पंढरपूर पायी यात्रा करतात तसेच पाचोरा येथे येणाऱ्या प्रत्येक दिंडीचे स्वागत करून त्या दिंडीतील भक्तांना महाप्रसाद देत असतात तसेच नानासाहेब आपला व्यवसाय संभाळून राजकारणाशी सर्वांशी हितसंबंध जपले आहेत त्यांच्या कार्याची पावती म्हणून नुकताच माळी समाजातर्फे पुणे येथील सावित्री शक्तिपीठ या ट्रस्टतर्फे त्यांना पगडी देऊन सन्मानित करण्यात आले त्यामुळे कोणतीही व्यक्ती ही आपले कार्य करीत असताना आपल्या आयुष्यात खचून न जाता आपले कार्य चालू ठेवावे समाज आपल्या चांगल्या कार्याची पावती नक्कीच देतात श्री नानासाहेब यांचे कर्तुत्व भारी त्यांची काम करण्याची किमया भारी समाज बांधवांना सोबत नेऊन काम करतात भारी त्यांना मिळालेल्या या सन्मानाचा पाचोरा शहरातील माळी समाज बांधवांनी त्यांचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रांगणातच सत्कार करून त्यांना पगडी परिधान केली यावेळी महाराष्ट्राचे भूषण असलेले श्री अनिल महाजन मुंबई येथून येऊन उपस्थित राहिले. आज दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त माननीय आमदार किशोर आप्पा पाटील व वैशालीताई सूर्यवंशी यांनी पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सोबत मान.सनी वाघ, माननीय नगरसेवक वासुदेव भिवसन महाजन, माजी नगराध्यक्ष संजय गोईल साहेब, माळी समाज अध्यक्ष के. एस. महाजन, सचिव शरद गीते ,संतोष महाजन, सुदर्शन महाजन, मयूर महाजन शुभम महाजन, डॉक्टर गोरख महाजन संजय महाले,चिंधू भाऊ मोकळ,गजानन महाजन, सुनील उमाळे, गजानन महाजन, जगन्नाथ महाजन,एम.एस. महाजन, युवराज भगवान महाजन, माननीय किशोर डोंगरे साहेब , सुनील शिंदे साहेब, श्रीराम मोतीराम महाले नाना, डॉक्टर प्रवीण माळी, डॉक्टर अतुल महाजन, कन्हैया महाजन, सुनील अशोक महाजन, डॉक्टर सुरेश महाजन, डॉक्टर दिनेश माळी, डॉक्टर संजय जाधव, सुनील उमाळे, अशोक शिवलाल महाजन, मोरे साहेब, एडवोकेट भाग्यश्री महाजन, एडवोकेट प्रवीण पाटील ,एडवोकेट अनिल पाटील, सावित्री शक्ती पिठाच्या महिला यांनी महात्मा फुले प्रतिमा पूजन व पुष्पमाला अर्पण तसेच समाजभूषण माननीय श्रीराम मोतीराम महाले यांचा सावित्री शक्तीपीठ पुणे, यांच्याकडून आलेली पगडी शक्तिपीठ पाचोरा चे अध्यक्ष ॲड भाग्यश्री महाजन (पाटील) यांच्या व इतर सर्व सावित्री च्या लेकीच्या हस्ते यांना परिधान करून सत्कार करण्यात आला. समाजातील अनेक समाज बांधव व मित्रपरिवार तसेच नातेवाईक उपस्थित होते. सावित्री शक्तीपिठाचे अध्यक्ष एडवोकेट भाग्यश्री महाजन(पाटील) व उपाध्यक्ष डॉ. वेदांती महाजन, मायाताई महाजन, जिजाबाई महाले, सविता महाले, करूना महाले, प्रो. वैशाली बोरकर, सरलाताई पाटील,एडवोकेट प्रवीण पाटील ,एडवोकेट अनिल पाटील, सावित्री शक्ती पिठाच्या सर्व सावित्रीच्या लेकी व सर्व इतर महिला यांनी महात्मा फुले यांचे प्रतिमा पूजन व पुष्पमाला अर्पण केली.