पाचोरा नवजीवन विद्यालयातील श्री प्रमोद पाटील यांनी आपला वाढदिवस पुस्तके वाटून केला साजरा

पाचोरा नवजीवन विद्यालयातील श्री प्रमोद पाटील यांनी आपला वाढदिवस पुस्तके वाटून केला साजरा

नवजीवन विद्यालय पाचोरा येथे सेवेसाठी असलेले प्रमोद रंगराव पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना उजळणी व बाराखडीचे पुस्तक भेट देऊन अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला. त्यांनी शाळेतील चाळीस विद्यार्थ्यांना या पुस्तकाचे वाटप केले अाहे. यासोबतच ते अंतुर्ली तालुका पाचोरा येथील रहिवासी असून गाव परिसरातील मित्रांचा व निकटवर्तीयांचा वाढदिवस ते महापुरूषांची पुस्तके भेट देऊन नेहमीच साजरा करत असतात. आज मोबाईलच्या आधुनिक युगात वाचन संस्कृती टिकविण्यासाठी व त्या प्रकारचे संस्कार मुलांवर घडविण्यासाठी त्यांना पुस्तके भेट देणे व मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे या दृष्टीने हा उपक्रम महत्वाचा असून प्रमोद पाटील यांनी राबविलेल्या उपक्रमाबद्दल पालक वर्गासह संस्थेचे अध्यक्ष श्री उत्तमराव राठोड, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस बी पवार यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत कौतुक केले आहे.