खा. सुजय विखेपाटील यांच्या उपस्थितीत राहुरी – पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांतील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

खासदार सुजय विखेपाटील यांच्या उपस्थितीत राहुरी – पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांतील कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश

(सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा) ‌‌ ‌अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी – पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांतील कार्यकर्त्यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुजयदादा विखेपाटील, जिल्हा बँकेचे चेरमन व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदार संघातील भाजपच्या विद्यमान लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे, शिवसेनेच्या शिंदे गटाचे पाथर्डी तालुका अध्यक्ष अंकुश चितळे,वृद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन उद्धवराव वाघ यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मीरी येथील राजयोग मंगल कार्यालयात हा प्रवेश सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.मीरी गावचे माजी सरपंच आदिनाथ सोलाट, विद्यमान उपसरपंच संजय शिंदे, कडगावचे ग्रामपंचायत सदस्य महादेव शिरसाठ, सचिन झाडे, गणेश कोरडे, भगवान मिरपगार, साईनाथ कोरडे,चंदू दारकुंडे,दिलिप कुर्हे, महेश सोलाट, संभाजी दारकुंडे, हरीभाऊ गुंड,संजय कोरडे,गोटराम तोगे,राजू तोगे यांच्या सह पंचक्रोशीतील शेकडो कार्यकर्त्यांनी ईतर पक्षाच्या बोगस कार्य पद्धतीला कंटाळून सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करुन खासदार सुजयदादा विखे पाटील यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा दिला आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजुनही अनेक गावांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मीरी जिल्हा परिषद गटातील युवा नेते एकनाथ आटकर, वैभव खलाटे,मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे, अॅडहोकेट वैभवराव आंधळे, जवखेडेचे लोकनियुक्त सरपंच चारूदत वाघ, विजय कोरडे, जेष्ठ नेते राजूमामा तागड, अण्णा शिंदे, प्रुथ्वीराज आठरे, अंजाबापू गोल्हार, संतोष मिरपगार, सुभाष आव्हाड, चंद्रकांत सोलाट यांच्या सह मीरी जिल्हा परिषद तील अनेक प्रमुख गावातील बुथ कमिट्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाथर्डी तालुका विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष मयुर तागड यांनी ही सुजयदादा विखेपाटील यांना पाठिंबा दिला आहे.