श्री स.भु प्रशाला गोंदेगाव दिनांक 08 मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

श्री स.भु प्रशाला गोंदेगाव दिनांक 08 मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाचोरा येथील सिद्धीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ ताईसो डॉ. ग्रिष्मा पाटील होत्या. प्रमुख पाहुणे शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय डॉ. योगेश दादा इंगळे, शालेय समिती सदस्य सदाशिव महालपुरे, सरपंच वनमालाताई निकम, सौ. मोनालीताई इंगळे ग्रा.प. सदस्य रेखाताई पवार , परिचारिका आव्हाळे मॅडम होत्या तसेच मुख्याध्यापक आदरणीय चित्तोडकर सर, उपमुख्याध्यापक आदरणीय श्री माळी सर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. ग्रिष्मा पाटील व प्रमुख पाहुण्यांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन केले. सर्व मान्यवर महिलांचे प्रशालेच्या वतीने भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय श्री चित्तोडकर सरांनी केले. प्रशालेतील महिमा सोनवणे, वाघ चैताली, निकिता घुले, सिद्धी नेरपगार, आर्या पाटील, प्रांजली महाले या विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे आदरणीय डॉ योगेश दादा इंगळे तसेच सरपंच वनमालाताई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा ताईसो डॉ. ग्रिष्मा पाटील यांनी त्यांच्या शैक्षणिक जिवनातील अनुभव कथन केले, सर्व विद्यार्थींनींनी उच्च शिक्षण घ्यावे असे आव्हान केले, स्रिशिक्षण व आरोग्य यावर मार्गदर्शन करून अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे संयोजन श्रीमती वैशाली पाटील, श्रीमती वर्षा दाबके यांनी केले तर सुत्रसंचालन श्रीमती अनिता वाघ यांनी केले तर आभार श्रीमती आशा पाटील यांनी केले.