आमदार तनपुरेनी विधानसभेत काढले जलजिवन मिशनचे वाभाडे!तर आमदार राजळेंची नवीन पोलिस स्टेशनची मागणी

आमदार तनपुरेनी विधानसभेत काढले जलजिवन मिशनचे वाभाडे!तर आमदार राजळेंची नवीन पोलिस स्टेशनची मागणी!

(सुनिल नजन “चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा) महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुरी -पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार गटाचे आमदार प्राजक्त तनपूरे यांनी सरकारच्या “हरघर नल,हरघर जल”या पेयजल योजनेचे चांगलेच वाभाडे काढत सरकारला धारेवर धरले. सरकारची नुसती घोषणा आहे प्रत्यक्षात मात्र काहीच नाही असे सांगून सर्व सामान्य शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा विज मिळावी म्हणून मागणी केली आहे. जलजिवन मिशनचा चुकीचा सर्वे झाला. २५ टक्के योजना खरी आणि ७५ टक्के वाढीव हा सर्वे काय अधिकाऱ्यांनी घरी बसून केला की काय अशी सरकारी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत हा प्रश्न तनपुरेनी थेट विधानसभेतच विचारला.चुकिचे सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीज, सरकारी अधिकारी यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. सन २२-२३च्या सालातील रस्त्याच्या कामांचे टेंडर ३ मे २३ला मंजूर झालेले दहा महिने होउन गेले तरी वर्क ऑर्डर दिली जात नाही.मग काय ठराविक ठेकेदारांना काम देण्यासाठी वर्क ऑर्डर राहील्या होत्या की काय? कुठल्यातरी ठेकेदाराची टक्केवारी राहिल्यामुळे आणि मर्जीतील ठराविक ठेकेदारांना काम देण्यासाठी वर्क ऑर्डरचे काम रोखले की काय असा प्रश्न उपस्थित करत आमदार तनपुरेनी सरकारची चांगलीच झाडाझडती घेतली.तसेच शेतीसाठी सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून विजेचा वापर करण्याच्या सूचनाही आ.तनपुरे यांनी विधानसभेत दिल्या.शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांनीही मतदारसंघात चार-पाच साखर कारखान्याच्या हद्दीत शेवगाव -पाथर्डी येथे नगर पालिका आहेत तेथे बाह्यवळण रस्त्यासाठी ६५ लाखाची तरतूद केली आहे पण ती तरतूद बजेट मध्ये मंजूर करण्याची मागणी केली.तसेच शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे आणि पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे नवीन पोलिस स्टेशनची मागणी केली आहे. एकंदरीत राहुरी -पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार तनपुरे व राजळे यांनी विधानसभेत आवाज उठवत सामान्य शेतकरी हिताचे प्रश्न विचारत मतदारांना दिलासा दिला आहे. जरी वेगवेगळ्या पक्षाचे दोन्ही आमदार असले तरी सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र मेहनत घेत मतदारांची मने जिंकून घेतु आहेत.त्यामुळेच हे आमदार लोकप्रिय झाले आहेत.