पाचोर्‍यातील नवीन आदर्श विद्यालयात मुलींसाठी स्वसंरक्षण शिबिर

पाचोर्‍यातील नवीन आदर्श विद्यालयात मुलींसाठी स्वसंरक्षण शिबिर

पाचोरा—
येथिल गिरणाई शिक्षण संस्था संचलित नवीन आदर्श माध्यमिक विद्यालयात शाळेतील मुलींसाठी शिंदे अकॅडमी आयोजित स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या 15 दिवसीय स्वसंरक्षण शिबिरात 140 शालेय मुली सहभागी झाल्या असून तज्ञ प्रशिक्षक सुनील मोरे व ऋतिका खरे यांच्याद्वारे मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत.

*शिंदे अकॅडमी चे अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून आदर्श माध्यमिक विद्यालयातील शाळकरी मुलींना १५ दिवसीय त्वायक्वांदो, मार्शल आर्ट व सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण देण्यात येत आहे.*

पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप गणगे यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराच्या उदघाट्न समारंभ नुकताच पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून .सौं . ललिता ताई पाटील( महिला सुरक्षा पथक पाचोरा) . सौं . जयश्री मराठे या उपस्थित होत्या.

शिंदे अकॅडमी व गजराज स्पोर्ट अकॅडमी यांच्या सहयोगातून या संरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एम. बी. देशमुख सर यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले . शाळेच्या मुख्याध्यापिका सौं . पूजा अमोल शिंदे यांनी देखील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ए. एम. सायानी मॅडम यांनी केले. यावेळी श्रीमती . के .डी. पाटील , श्रीमती रीना महाजन उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत