श्री.गो .से हायस्कूल पाचोरा येथे मराठी भाषा गौरव दिवस साजरा

श्री.गो .से हायस्कूल पाचोरा येथे मराठी भाषा गौरव दिवस साजरा

पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित. श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे आज सकाळी चित्रकला दालन मध्ये मराठी भाषा गौरव दिवस उत्साहाने संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मराठी भाषेविषयी माहिती दिली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील होते .त्यांनी प्रत्येक घरात मराठीचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले मराठी बोलीभाषा ही आपली मातृभाषा असून तिचा वापर झालाच पाहिजे असे सांगितले .व्यासपीठावर पर्यवेक्षिका अंजली गोहिल ,ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा पाटील, संगीता वाघ, ज्येष्ठ शिक्षक प्रितमसिंग पाटील, कलाशिक्षक सुबोध कांतायन, प्रमोद पाटील, ज्योती पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बोरसे यांनी तर आभार एस. एल वाघ यांनी मानले