गो से हायस्कूल पाचोरा येथील शिक्षकांची शाळा बाह्य विद्यार्थ्यांची सर्वेक्षण व कुटुंबीयांची सर्वसाधारण माहिती घेण्यात येत आहे

श्री गो से हायस्कूल पाचोरा येथील शिक्षकांची शाळा बाह्य विद्यार्थ्यांची सर्वेक्षण व कुटुंबीयांची सर्वसाधारण माहिती घेण्यात येत आहे यात शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी शहरातील प्रभाग क्रमांक एक च्या १२ कॉलनी भाग पिंजून काढला शिक्षण विभागाच्या आदेशानुसार दिनांक 1 मार्च ते 10 मार्च या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील शाळा बाह्य विद्यार्थी शोध मोहीम जोरात असून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी मेहनतीने सर्वे करत आहेत या मोहिमेसाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विकास पाटील व केंद्रप्रमुख भातखंडे व श्री. गो .से. हायस्कूल चे मुख्याध्यापक सुधीर पाटील ,उपमुख्याध्यापिका सौ पी एम वाघ, पर्यवेक्षक आर एल पाटील , एन आर पाटील, ए बी अहिरे यांच्यासह सर्व कर्मचारी या सर्वेक्षणात सहभागी होऊन कार्य पार पाडत आहेत