लोकसभा निवडणुकीची लगीनघाई सुरू, अधिसूचना १२ मार्चला ?

लोकसभा निवडणुकीची लगीनघाई सुरू, अधिसूचना १२ मार्चला ?

(सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली असून १२ मार्चला मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यां मार्फत निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. निवडणुकीची नेमकी आचारसंहिता कधी लागू होणार या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अनेकांनी जंग जंग पछाडले होते पण उत्तर काही केल्या सापडत नव्हते. आचारसंहितेच्या चिंतेने अनेक जण ग्रासले होते.पण आता त्याचं उत्तर मिळाले आहे.बारा मार्चला लोकसभा निवडणूकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.दि.२८ मार्च पासून लोकसभा निवडणूकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल.१९ एप्रिल २०२४ या दिवशी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.दि.२२ मे २०२४ रोजी मतमोजणी होउन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.आणि दि. ३० मे २०२४ रोजी नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे. अशा प्रकारची माहिती जारी करण्यात आली आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना सरकारी बाबू मात्र मार्च एंड पुर्वीच साऱ्या सरकारी निधीची विल्हेवाट लावण्यासाठी मश्गूल झाले आहेत.कोणाला कितीही टक्केवारी देउन काम पूर्ण झाल्याचं कागदोपत्रीच दाखवण्यासाठी जणूकाही सर्वच खात्याच्या अधिकाऱ्यांची स्पर्धाच लागली आहे.सामांन्य मतदार मात्र पुढाऱ्यांच्या पक्षाच्या अदलाबदली च्या खेळाला पुर्ण वैतागून गेला आहे.महाराष्ट्रातील एकूण ४८ जागा वाटपाची चर्चा सर्वच पक्षात सुरू झाली असून अनेक ठिकाणी एकाच जागेसाठी अनेक पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यास काही जण पुन्हा पक्षांतराची भाषा बोलताना दिसत आहेत.एकुणच निवडणुकीचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे.