श्रीरामपुर मध्ये घरफोडून चोरी करणाऱ्या देवळाली प्रवराच्या दोन सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) श्रीरामपूर शहरात घर फोडून चोरी करणाऱ्या दोन संशयित गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.या बाबदची माहिती अशी की फिर्यादी मोहंमद रफिक शेखलाल शेख,रा. अतिथी कॉलनी, वार्ड नं.1 श्रीरामपुर हे आपल्या काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते.ना
ताळाच्या दिवशी म्हणजे दिनांक 25/12/2025 रोजी मध्यरात्री 12.20 वाजण्याच्या सुमारास पुन्हा घरी आले असता त्यांचे घर कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील दरवाजाचे कुलूप जड हत्याराने तोडुन घरात प्रवेश केला.आणि घरातील लॉकर व कपाटातील सोन्याचे दागदागिने,व रोख स्वरूपातील रक्कम,किंमती घड्याळ,तीन मोबाईल हॅंडसेट, बॅंकेचे ए.टी.एम.कार्ड, आधरकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स,असा एकुण दोन लाख दहा हजार रुपये (2,10,000) रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेलेला आहे.सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन मध्ये गु.र.नं. 1111/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331 (4),305 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सुचना दिलेल्या होत्या.वरील सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्या करीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक, संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, रमीजराजा आत्तार,विशाल तनपुरे,भगवान थोरात,योगेश कर्डीले,प्रशांत राठोड,यांचे एक पोलीस पथक तयार करुन आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणण्या साठी सदर पोलिस पथकास सुचना देत व मार्गदर्शन करुन रवाना केले होते.
सदर पोलिस पथकाने घटना स्थळी भेट देवुन आजपर्यंत अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या पोलिस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगारा संदर्भात माहिती संकलित करुन त्या आधारे गुन्ह्यातील आरोपींचा व्यवसायीक कौशल्याच्या आधारे शोध घेतला असता त्यांना माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे समीर शब्बीर शेख रा. खटकाळी, देवळाली प्रवरा, तालुका राहुरी,जिल्हा अहिल्यानगर याने त्याच्या दोन साथीदारासह केला असल्याची माहिती गुप्त खबऱ्या मार्फत मिळाल्याने सदर पोलिस पथकाने एका ठिकाणी दिनांक 29/12/2025 रोजी छापा टाकून त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव गाव विचारले असता त्यानें त्यांचे नाव 1) समीर शब्बीर शेख,(वय 28 वर्षे) राहणार खटकळी, देवळाली प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्याकडे श्रीरामपूर येथे घडलेल्या सदरच्या गुन्ह्यांबाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा त्याचे इतर साथीदार नामे 2) जैद उर्फ सरफराज मुश्ताक सय्यद,राहणार इस्लामपुरा, देवळाली प्रवरा, तालुका,राहुरी 3) विजय उर्फ खंडु इथापे, राहणार देवलाली प्रवरा, तालुका राहुरी, (फरार) या तिघांनी मिळुन केला असल्याची कबुली पोलिसांना दिली होती. त्यानंतर सदर पोलिस पथकाने जैद उर्फ सरफराज मुश्ताक सय्यद व विजय उर्फ खंडु इथापे याचा शोध घेतला असता 2) जैद उर्फ सरफराज मुश्ताक सय्यद, (वय 22 वर्षे), राहणार इस्लामपुरा, देवळाली प्रवरा, तालुका,राहुरी ,हा पोलीसांना एका ठिकाणी मिळुन आला होता.
आरोपी नामे समीर शब्बीर शेख याच्या विरुध्द यापुर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
1) पारनेर पोलिस स्टेशन,जिल्हा. अहिल्यानगर येथे गु.र.नं. 902/2019 भा.द.वि. कलम 379,427,34
2) सोनई,तालुका नेवासा,जिल्हा अहिल्यानगर येथे गु.र.नं. 300/2023 भा.द.वि. कलम 379,34,201
आरोपी नामे जैद उर्फ सरफराज मुश्ताक सय्यद याच्या विरुध्द यापुर्वीही अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
1)राहुरी,जिल्हा अहिल्यानगर येथे गु.र.नं. 1119/2023 भा.द.वि. कलम 380,361,34
2 )नेवासा,जिल्हा अहिल्यानगर येथे गु.र.नं.1178/ 2022भा.द.वि. कलम 379
3 )गंगापुर,जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे गु.र.नं.190/ 2023 भा.द.वि. कलम 379,34 प्रमाणे,ताब्यातील आरोपी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 1111/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(4), 305 प्रमाणे दाखल गुन्ह्यांच्या तपासकामी हजर करण्यात आले असुन,पुढील तपास श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.गुन्हेगार किती ही हुषार असला तरी पोलिस त्याच्या पर्यंत निश्चितच पोहोचल्या शिवाय रहात नाहीत. ही अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिसांचा आज पर्यंतचा इतिहास आहे.
























