पाचोऱ्यात भव्य वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन उत्साहात संपन्न

पाचोऱ्यात भव्य उन्हाळी वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन उत्साहात संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी)
आपल्या पाचोरा शहरात प्रथम च वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले .आज धकाधकीच्या जीवनात आपल्याला आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही मुल मोबाईल आणि कम्प्युटर च्या आहारी जात आहेत मुलांमध्ये संस्काराची कमी भासत आहे
आज मुले आपल्या आई वडील यांना सुद्धा मानायला तयार नाहीत किवा आपल्या सख्या भाऊ बहिणी ला पण प्रेम द्यायला तयार नाहीत. आधुनिकतेच्या नावाखाली धर्मा पासून लांब जात आहेत कित्येक मुलांना आपला धर्मग्रंथ श्रीमद् भगवद्गीता आहे हे सुद्धा माहित नाही म्हणून धर्मा पासून संस्करा पासून लांब जात आहेत आणि समाजात बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे म्हणून च ही बाब लक्षात घेऊन आपल्या पाचोरा शहरात असणाऱ्या लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेने सामाजिक भान राखून संस्थेच्या अध्यक्षा सौ सुनीता ताई पाटील तसेच त्यांचे पती संस्था प्रमुख भागवताचार्य योगेश जी महाराज धामणगावकर या दोघी उभयांतनी गु संजय महाराज पाचपोर यांच्या मार्गदर्शनाने उन्हाळी वारकरी बाल संस्कार शिबिराचे आयोजन केले .
जेणेकरून याठिकाणी विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षण तसेच गितापाठ हनुमान चालीसा तसेच ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा व मृदुंग आणि गायनाच मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि हे शिबिर दि 5 मे ते दि 15 मे दरम्यान शक्ती धाम भडगाव रोड पाचोरा येथे करण्यात आले. तरी या शिबिराचा लाभ तालुका आणि जिल्ह्यातील सर्व बाल गोपाल यांनी घेतला. असे आवाहन संस्थेचे आधारस्तंभ आदरणीय श्री रमेश जी मोर आणि शक्ती धाम ग्रुप पाचोरा व संस्था प्रमुख भागवताचार्य योगेशजी महाराज धामणगावकर व सौ सुनीता ताई पाटील यांनी केले होते. आज दिनांक12 रोजी याची सांगता करण्यात आली कृष्णापुरी छत्रपती शिवाजी महाराज चौक,सराफ बाजार, गांधी चौक, या ठिकाणी सर्व वारकऱ्यांनी तालासुरात प्रत्येक करून दाखवला छत्रपती शिवाजी महाराज चौकात माळकर यांना थंड देण्यात आले आशिबिरासाठी आदरणीय श्री रमेश जी मोर तसेच प्रा अजय थेपडे थेपदे बिल्डर सुजित तिवारी आणि परीवार.डॉ विष्णु पाटील.अविनाश पाटील.डॉ गवांदे समस्त पाचोरा वासी यांचे सहकार्य लाभले